Home महाराष्ट्र राज्यातील घडामोडींना वेग; मुख्यमंत्री राज्यपलांच्या भेटीला राजभवनावर, तर फडणवीसांच्या निवासस्थानी महत्त्वाची बैठक

राज्यातील घडामोडींना वेग; मुख्यमंत्री राज्यपलांच्या भेटीला राजभवनावर, तर फडणवीसांच्या निवासस्थानी महत्त्वाची बैठक

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : मराठा आरक्षणावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यातील घडामोडींना वेग आलाय.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांच्या भेटीसाठी राजभवनावर दाखल झाले असून दुसरीकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर निवासस्थानी भाजपच्या कोअर कमिटीची महत्त्वाची बैठक पार पडत आहे.

ही बातमी पण वाचा : मोठी बातमी! शिंदे गटाच्या खासदारानंतर आता अजित पवार गटातील ‘हा’ आमदार देणार राजीनामा?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात मराठा आरक्षणाबाबत चर्चा झाली. त्यानंतर मुख्यमंत्री राज्यपालांच्या भेटीला गेले आहेत.

दरम्यान, मराठा आरक्षणासाठी राज्यपाल विशेष अधिवेशनाची सूचना करु शकतात. या अधिवेशनात मराठा आरक्षणासाठी ठोस निर्णय किंवा विचार विनिमय करण्याचा निर्णय होऊ शकतो.

महत्त्वाच्या घडामोडी – 

जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांवर विश्वास ठेवावा – देवेंद्र फडणवीस

शिवरायांच्या पुतळ्यासमोर नतमस्तक होत मुख्यमंत्र्यांची मराठा आरक्षणाबद्दल मोठी घोषणा, म्हणाले…

“2019 च्या मुख्यमंत्रीपदासंदर्भात एकनाथ शिंदेंचा मोठा गाैफ्यस्फोट म्हणाले, ठाकरेंनी, पवारांकडे 2 माणसं पाठवली अन्…”