मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलिस अधिकारी जीवाची बाजी लावून काम करत आहेत. पण या कोरोनाच्या युध्दामध्ये महाराष्ट्रातील तसंच देशातील अनेक पोलिस कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली आहे. मुंबईतल्या धारावीत पोलिस स्थानकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल कुलकर्णी यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यानंतर मुंबई पोलिसांनी एक भावूक ट्विट केलं आहे.
कुणी 5 कोटी दिलेत तर कोणी 500 कोटी दिलेत, आम्ही आमचं आयुष्य देतोय… अशी ओळ लिहित मुंबई पोलिसांनी अमोल कुलकर्णी यांना श्रध्दांजली वाहिली आहे.
दरम्यान, कोरोनाविरुद्धच्या लढाईमध्ये अमोल कुलकर्णी या सहाय्यक पोलीस निरीक्षकाच्या निधनानंतर त्यांच्या प्रोफाइलवर त्यांनीच पोस्ट केलेला एक जुना फोटो ट्विटरवरुन शेअर करत अमोल कुलकर्णी यांच्या आत्म्याला शांती मिळो, अशी प्रार्थना मुंबई पोलिसांनी केली आहे.
For a true policeman, ‘Duty before self’ is a way of life!
One of the recent posts on the personal profile of Late API Amol Kulkarni, who made the highest sacrifice in the fight against #coronavirus
We pray for his soul to rest in peace. pic.twitter.com/hObQIeX6BJ
— Mumbai Police (@MumbaiPolice) May 16, 2020
महत्वाच्या घडामोडी-
…त्यामुळे काळजी नसावी; शरद पवारांवर केलेल्या टीकेला रोहित पवारांचं प्रत्युत्तर
‘लावा’ कंपनी चीनमधील व्यवसाय भारतात हलवणार; करणार ‘इतक्या’ कोटींची गुंतवणूक
निलेश राणेंची शरद पवारांवर टीका; म्हणाले…
…तर चंद्रकांत पाटलांनी हातोडे, विळे, कोयते घेऊन कामाला लागावे; शिवसेनेची सामनामधूम टीका