आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : काही दिवसांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईतील सभेत बोलताना, मशिदीवरील भोंगे हटविण्याची भूमिका घेतली होती. राज यांच्या या घोषणनंतर उत्तर प्रदेश सरकारने प्रार्थनास्थळांवरील भोंगे विशेषत: मशिदीवरील अनधिकृत भोंग्याविरोधात कडक कारवाईला सुरुवात केली आहे. योगींच्या या निर्णयावरून राज ठाकरे यांनी योगींचं काैतुक केलं. आता या प्रकरणात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
राज ठाकरे यांनी राज्यातील सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधताना राज्यातील राज्यकर्ते हे भोगी असल्याचा टोला लगावला आहे. याचाच धागा पकडत अमृता फडणवीसांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व महाविकास आघाडी सरकारवर अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे. “ऐ ‘भोगी’ काहीतरी शिक आमच्या ‘योगीं’कडून”, असं ट्विट अमृता फडणवीस यांनी केलंय.
हे ही वाचा : उद्या ठाकरे सरकार विरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करणार- किरीट सोमय्या
दिवसभर सुरु असणाऱ्या याच आरोप प्रत्यारोपांचा धागा पकडत गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मोजक्या शब्दात ट्विट केलं. कोणी योगी आहे, कोणी भोगी आहे तर कुणी मानसिक रोगी आहे, असं जितेंद्र आव्हाडांनी ट्विट केलं.
दरम्यान, जितेंद्र आव्हाडांच्या या ट्विटमुळे आव्हाडांनी नेमकी कोणावर टीका केली, यावरून कमेंटमध्ये चर्चा सूरू असल्याचं पहायला मिळत आहे.
कोणी योगी आहे
कोणी भोगी आहे
तर कुणी मानसिक रोगी आहे pic.twitter.com/cPcacvoiZJ— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) April 28, 2022
महत्वाच्या घडामोडी –
उद्या ठाकरे सरकार विरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करणार- किरीट सोमय्या
सांगली जिल्ह्यात राष्ट्रवादीची ताकद वाढवणार; राष्ट्रवादीच्या ‘या’ आमदाराचं विधान