Home जळगाव निवडणुकीपूर्वीच शिवसेनेला मुख्यमंत्रिपद देण्यास देवेंद्र फडणवीसांनी नकार दिला होता; एकनाथ खडसेंचा गौप्यस्फोट

निवडणुकीपूर्वीच शिवसेनेला मुख्यमंत्रिपद देण्यास देवेंद्र फडणवीसांनी नकार दिला होता; एकनाथ खडसेंचा गौप्यस्फोट

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

जळगाव : भाजप नेते आशिष शेलार यांनी 2017 मध्ये भाजप आणि राष्ट्रवादी युती होणार होती. त्यास शिवसेनेने विरोध केला होता असा गौप्यस्फोट केला आहे. यावर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.

2014 ची विधानसभा निवडणूक भाजप-शिवसेना स्वतंत्र लढली. मात्र 2019 ची निवडणूक भाजप-शिवसेना एकत्रित लढली. जर 2017 मध्ये भाजपा आणि राष्ट्रवादीला सोबत घेण्याचा शिवसेनेकडून विरोध होता तर मग 2019 मध्ये भाजपा-शिवसेना एकत्रित निवडणूक का लढले? असा प्रश्न एकनाथ खडसे यांनी यावेळी केला.

हे ही वाचा : सांगली जिल्ह्यात राष्ट्रवादीची ताकद वाढवणार; राष्ट्रवादीच्या ‘या’ आमदाराचं विधान

खरे पाहता अशिष शेलार यांनी दिलेली माहिती अर्धवट आहे. कारण 2019 मध्ये झालेल्या निवडणुकीपूर्वी झालेल्या चर्चेत शिवसेनेला अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद हवे होते. मात्र त्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी नकार दिला. त्याच वेळी जर अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद शिवसेनेला देण्याचं ठरलं असते तर युती तुटली नसती, असा गौप्यस्फोट एकनाथ खडसे यांनी यावेळी केला.

दरम्यान,  सत्ता हातून गेल्यामुळे भाजपचे नेते अस्वस्थ झाले आहेत. त्यामुळे पुन्हा सत्ता मिळवण्यासाठी भाजप नेते कासावीस झाले असून, सत्ताधाऱ्यांवर विविध आरोप करताना दिसत आहेत. राज्यात कायदा सुव्यवस्था राहिली नसल्याचा आरोप ते करत आहे. एक तर महागाई गगनाला भिडली आहे. त्यामुळेच भोंगे, हनुमान चालिसाचे मुद्दे उकरून विरोधकांकडून जनतेचे लक्ष विचलित करण्याचे प्रयत्न सुरू आहे. विरोधककांकडून राज्यात वारंवार अशांतता निर्माण करण्याचे काम सुरू आहे, असंही एकनाथ खडसे म्हणाले आहेत.

महत्वाच्या घडामोडी –

राज ठाकरेंच्या औरंगाबाद सभेसाठी पोलिसांच्या 16 अटी; मनसेने दिली प्रतिक्रिया

भोंग्याच्या वादात आता अमृता फडणवीसांची उडी; ठाकरे सरकारवर साधला निशाणा; म्हणाल्या…

“भाजप-मनसे युती होणार?; राज ठाकरे लवकरच योगी आदित्यनाथांच्या भेटीला; चर्चांना उधाण”