…तर तुमचे कोट तुम्हाला भांडीवालीला द्यावे लागतील; संजय राऊतांचं शेलारांना प्रत्युत्तर

0
971

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई: शिवसेनेला पंतप्रधानपदाची स्वप्ने पडत असून संजय राऊत यांनी तर कोटही शिवून ठेवला आहे, अशी टीका भाजप नेते आशिष शेलार यांनी केली होती. या टीकेवर आता शिवसेना नेते संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना बोलत होते.

मी कधीच कोट शिवत नाही. कोट तुमचेच लटकून पडले आहेत. आम्ही महाराष्ट्राबाहेर एक लोकसभा जिंकली त्याचा आनंद आहे. तुमचं केंद्र सरकार आणि गुजरातचं मंत्रिमंडळ तिथे होतं. तरीही आम्ही जिंकलो याचा आनंद आहे. स्वप्न काय तुम्हालाच पाहता येतात का? आम्हीही स्वप्न पाहण्याची क्षमता राखून ठेवतो. महाराष्ट्रात काय झालं ते तुम्ही पाहिलंच आहे, असं संजय राऊत म्हणाले आहेत.

हे ही वाचा : फक्त घोषणा करून आणि भाषण देऊन शेतकऱ्यांचे प्रश्न सुटत नाहीत- रक्षा खडसे

दरम्यान, 2024नंतर तुम्ही पाहालचं. त्यानंतर तुम्हाला तुमचे कोटही भांडीवालीला द्यावे लागतील, असं म्हणत महाराष्ट्राच्याबाहेर आमचं पहिलं पाऊल आहे. आमचा खासदारांचा आकडा चांगला आहे. हा आकडा वाढेल. आमचं महत्त्व वाढेल. भाजपच्या पोटात का दुखतं? महाराष्ट्राच्याबाहेर आम्ही विस्तार करणार आहोत, असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी – 

फेसबुकची मोठी घोषणा ; ‘ही’ महत्त्वाची सुविधा होणार बंद

फडणवीसांनी दिवाळीनंतर बाॅम्ब फोडण्याऐवजी दिल्लीत जाऊन तोंड उघडावं- रोहित पवार

एक निवडणूक काय जिंकलीय शिवसेना पंतप्रधानपदाची स्वप्न पाहू लागलीय; भाजप नेत्याचा टोला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here