Home महाराष्ट्र ….तर ठाकरे सरकार शिवसेनेची देखील चौकशी करणार का?; आशिष शेलारांचा सवाल

….तर ठाकरे सरकार शिवसेनेची देखील चौकशी करणार का?; आशिष शेलारांचा सवाल

मुंबई : माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या जलयुक्त शिवार या महत्त्वाकांक्षी योजनेतील गैरकारभाराबाबत ‘कॅग’ने ताशेरे ओढल्यानंतर, आता या योजनेची चौकशी करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने बुधवारी घेतला. यावरुन भाजपचे नेते आशिष शेलार यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.

जलयुक्त शिवार योजना संपूर्ण राज्याचा मजुरांसाठी एक जन आंदोलन होते. ही योजना लोकसहभागातून गावांपर्यंत पोहचली. या योजनेत शेतकरी, मजूरांनी घेतलेले कष्ट अपार आहेत. तुम्ही या कष्टकऱ्यांच्या कष्टाची चौकशी करणार का?, असा सवाल करत आशिष शेलार यांनी यावेळी उपस्थित केला आहे.

दरम्यान, ज्या कॅबिनेटमध्ये ही योजना बनली त्यामध्ये शिवसेनेचे देखील मंत्री होते. या कामात शिवसेनेचे आमदार देखील सहभागी होते. तर, महाराष्ट्राचे आजचे ठाकरे सरकार शिवसेनेची देखील चौकशी करणार आहे का? असा प्रश्नही आशिष शेलार यांनी राज्य सरकारला केला आहे.

महत्वाच्या घडामोडी-

के.एल राहुल व ख्रिस गेलची शानदार फलंदाजी; पंजाबचा आरसीबीवर शेवटच्या चेंडूवर विजय

उद्धव ठाकरेंना गजनी म्हणणाऱ्या नेत्याला शिवसेनेचं प्रत्युत्तर

तुम्ही स्वताला हिंदुत्ववादी मानता तर मग हिंदूंच्या मागण्यांना विरोध का करता?; चंद्रकांत पाटलांचा मुख्यमंत्र्यांना सवाल

पोलिसाला मारणे पडले महागात; मंत्री यशोमती ठाकूर यांना न्यायालयाने सुनावली ‘ही’ शिक्षा