“…तर सत्ताधारी मंत्र्यांना काळे झेंडे दाखवणार”

0
199

औरंगाबाद : देशात प्रथमच आंतरराष्ट्रीय दर्जाचे एक क्रीडा विद्यापीठ सुरु करण्यात येत आहे. त्याची मुहूर्तमेढ महाराष्ट्रातील पुण्यातून रोवण्यात आली आहे. हे क्रीडा विद्यापीठ सुरुवातीला औरंगाबाद येथे सुरु करण्याचे प्रस्तावित होते. मात्र, विद्यमान सरकारने हे विद्यापीठ पुणे येथे हलवले. यावरुन औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील  यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे.

औरंगाबादेतील क्रीडा विद्यापीठ पुण्यात हलवल्यास सत्ताधारी मंत्र्यांना काळे झेंडे दाखवणार, असा इशारा इम्तियाज जलील  दिलाय. ते औरंगाबाद येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.

दरम्यान, राज्यात शिवसेनेची सत्ता आहे. क्रीडा विद्यापीठ औरंगाबादेत व्हावे यासाठी शिवसेनेच्या माजी खासदारांनीही सरकारकडे पाठपुरावा करावा, असं आवाहनही इम्तियाज जलिल यांनी यावेळी केलंय.

महत्वाच्या घडामोडी –

महाराष्ट्रातील भाजप खासदारांची दिल्लीत गुप्तबैठक; दानवेंच्या घरी होणारखलबतं, राजकीय चर्चांना उधाण

“हिंदूमध्ये भितीचं वातावरण निर्माण करण्याचं काम ठाकरे सरकारच्या माध्यमातून सुरू आहे”

राहुल गांधी यांच्या विरोधात ट्विटरची मोठी कारवाई; अकाऊंट सस्पेंड

राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार आज सांगोला दौऱ्यावर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here