मुंबई महानगर पालिकेच्या विरोधात मनसेचं अनोखं आंदोलन; पालकमंत्र्यांना दिला इशारा

0
436

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : मनसेच्या वतीने नवी मुंबई महानगर पालिकेच्या विरोधात प्रलंबित मागण्यासाठी ढोल वाजवून आंदोलन करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांनी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला आहे.

“करोनाच्या संपूर्ण कालखंडात सर्व कामगारांनी मदत घेतली. कुठल्याही प्रकारचा हलगर्जीपणा झाला नाही, उलट जीवावर उदार होऊन या सगळ्या कामगारांनी काम केलं आहे. याच सर्व आयुक्तांनी त्यावेळच्या प्रशासनाने हे सांगितलं होतं की, 300 रुपये दिवसाला या प्रमाणे यांना कोविड भत्ता दिला जाईल. मात्र अद्यापही या गोष्टीची पूर्तता करण्यात आलेली नाही, असं संदीप देशपांडे म्हणाले आहेत.

हे ही वाचा : “जोतिबा मंदिराचा ई-पास बंद करण्यासाठी, ग्रामस्थांकडून गाव बंद ठेवून, मंदिरासमोर आंदोलन” 

दरम्यान, ज्या लोकांचा मृत्यू झाला त्यांच्या कुटुंबीयांना पाच लाख रुपये नवी मुंबई महापालिकेच्या मार्फत आणि 50 लाख रुपये शासानाच्या मार्फत देण्याची घोषणा केली होती. अजून पर्यंत त्यांना एकही रुपया मिळालेला नाही, असंही संदीप देशपांडेंनी सांगितलं.

आज आम्ही आयुक्तांशी चर्चा करू, ठोस आश्वासन त्यांच्याकडून घेऊन येऊ. याची आम्हाला खात्री आहे, नाहीतर मग आम्हाला इथले जे पालकमंत्री आहेत आणि आमची जी माहिती आहे त्याप्रमाणे पालकमंत्र्यांनी सांगितलं की, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला याचं श्रेय मिळायला नको म्हणून तुम्ही मागण्या मान्य करू नका. जर अशाप्रकारे पालकमंत्र्यांची मानसिकता असेल, तर मला असं वाटतं त्यांच्या मेंदूचा इलाज करावा लागेल आम्हाला आणि तो आमच्या पद्धतीने करू. मग फिरा दाढी खाजवत कुठं फिरतायत ते, असा इशाराही संदीप देशपांडे यांनी यावेळी दिला.

महत्वाच्या घडामोडी –

“राजकीय वातावरण तापलं, शरद पवार उद्धव ठाकरेंच्या भेटीला, तर फडणवीस राज्यपालांच्या भेटीला, चर्चांना उधाण”

आगामी मुंबई महापालिकेत महापाैर भाजपचा, तर उपमहापाैर रिपाईचा असणार- रामदास आठवले

“उत्तर प्रदेशात शिवसेना भाजपला आव्हान ठरतंय?; शिवसेना नेत्यामुळे भाजप उमेद्वाराचा पराभव”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here