आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : दसरा मेळाव्याच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात चढाओढ सूरू आहे. तसेच शिवाजी पार्क म्हणजेच शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्यासाठी उद्धव ठाकरे आणि शिंदे गट यांच्यात चढाओढ सुरु असतानाच यात आता शिंदे गटातील रामदास कदम यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
बाळासाहेब संपूर्ण देशाला एक विचार देत होते. मात्र आता माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जे विचार देतील ते काँग्रेसच्या प्रमुख सोनिया गांधींचे विचार असतील. त्यामुळे बाळासाहेबांचे विचार देशभरात पोहचवण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांचा दसरा मेळावा शिवतीर्थावर झाला पाहिजे, असं रामदास कदम म्हणाले.
हे ही वाचा : काँग्रेसचा ‘हा’ नेता पक्षाला रामराम करण्याच्या तयारीत?; भाजपमध्ये प्रवेश करणार?
दरम्यान, दसरा मेळाव्यासाठी दोन्ही गटाने अर्ज केल्यामुळे महापालिका प्रशासनाकडून शिवाजी पार्क ‘फ्रीज’ केलं जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे बीकेसीतील मैदानाचा पर्याय शिंदे गटाने निवडला आहे.
महत्त्वाच्या घडामोडी –
वेदांता प्रकल्प गुजरातला जाण्यामागचं नेमकं कारण काय?; देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं कारण, म्हणाले…
केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी सांगितला, शिवसैनिक आणि गद्दारीतला फरक, म्हणाले…
राष्ट्रवादीचा ‘हा’ नेता पक्षाला राम राम ठोकण्याच्या तयारीत; शिंदे गटात सामील होण्याची शक्यता