आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
उल्हासनगर : राज्यात खड्ड्यांच्या मुद्द्यावरून राजकारण चांगलंच तापलं आहे. याच पार्श्वभूमीवरुन आता केंद्रीय राज्यमंत्री तसेच रिपाईंचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधलाय. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाच्या 64 व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमासाठी आठवले हे उल्हासनगर येथे आले होते. यावेळी ते माध्यमांशी बोलत होते.
राज्य सरकारला सत्तेवर येऊन दोन वर्षे झाली. मात्र, दोन वर्षांपासून राज्य सरकारने रस्त्यावरील खड्डे बुजविण्याकडे दुर्लक्ष केले. त्यांचे लक्ष्य फक्त सत्ता टिकविण्याकडे आणि एकमेकांवर आरोप करण्याकडे आहे, अशी टीका रामदास आठवलेंनी यावेळी केली आहे.
दरम्यान, खड्डे भरण्याचे काम झालेले नाही. खड्डे जर बुजवले नाही, तर हे सरकार खड्ड्यात गेल्याशिवाय राहणार नाही. म्हणून या सरकारने राज्यातील रस्त्यावर पडलेले खड्डे लवकरात लवकर भरावे, असं रामदास आठवले म्हणाले आहेत.
महत्वाच्या घडामोडी –
“देवेंद्र फडणवीसांच्या ताफ्यातील गाडीनं दुचाकीस्वारास उडवलं; 3 जण जखमी”
राज ठाकरेंचा आदेश; मनसेची पूरग्रस्त शेतकऱ्यांना ‘ही’ मोठी मदत
“शरद पवार आमदार निलेश लंकेंच्या घरी, लंके कुटुंब भारावलं”
भाजपाच्या ‘या’ महिला आमदारांच्या पतीला जीवे मारण्याची धमकी