Home महाराष्ट्र …म्हणून ते राष्ट्रपती राजवटीची मागणी करत असतात; जयंत पाटलांचा विरोधकांना टोला

…म्हणून ते राष्ट्रपती राजवटीची मागणी करत असतात; जयंत पाटलांचा विरोधकांना टोला

मुंबई : राज्यात राष्ट्रपती राजवट  लागू करण्याची मागणी भाजप नेते नारायण राणे यांनी केली होती. यावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते टीव्ही 9 मराठीशी बोलत होते.

मासा पाण्याबाहेर काढल्यावर तो तडफडतो. सत्तेच्या बाहेर पडलेल्यांची अवस्था तशीच झाली आहे. त्यामुळे ते राष्ट्रपती राजवटीची मागणी करत असतात, असं म्हणत जयंत पाटील यांनी विरोधकांवर निशाणा साधालाय.

राज्यात कधी राष्ट्रपती राजवट लागू होते आणि कधी आम्ही सत्तेत येतो असं विरोधकांना झालं आहे. राष्ट्रपती राजवट लागूच करायची असेल तर उत्तर प्रदेश आणि गुजरातमध्ये लावावी लागेल. त्यात या राज्यांचा नंबर वरचा आहे. त्यानंतर इतरही राज्य आहेत. महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करणं इतकं सोप नाही, असंही जंयत पाटील म्हणाले.

भाजप नेते नारायण राणे यांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली आहे. त्यावर तुमची काय प्रतिक्रिया आहे असं विचारण्यात आलं. त्यावर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

महत्वाच्या घडामोडी –

बेळगावातील मराठी माणसांवरील अत्याचार थांबत नसतील तर…; शिवसेनेचा इशारा

“शरद पवारांनीच अनिल देशमुखांना तात्काळ घरी पाठवावं”

“अहमदनगरमध्ये भाजपला धक्का; ‘या’ मोठ्या नेत्यानं केला राष्ट्रवादीत प्रवेश”

…तर शिवसेनेची ‘ती’ प्रकरणं बाहेर काढेन; नितेश राणेंचा वरुण सरदेसाईंना इशारा