मुंबई : बेळगावमध्ये मराठी लोकांवर होणाऱ्या हल्ल्यांवर शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामना अग्रलेखातून भाष्य करण्यात आलं आहे.
बेळगावात सध्या मराठी लोकांवर जे हल्लेसत्र सुरु आहे ते संतापजनक आहे. महाराष्ट्राने एकवटून या हल्ल्याचा प्रतिकार केलाच पाहिजे, असं सामना अग्रलेखात म्हटलं आहे. तसेच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आम्ही विनंती करतो, कर्नाटकात आणि दिल्लीत भारतीय जनता पक्षाचे सरकार आहे. बेळगावातील मराठी भाषिकांवरील अत्याचारांविरुद्ध एक सर्वपक्षीय शिष्टमंडळ कर्नाटकचे मुख्यमंत्री आणि देशाच्या पंतप्रधानांकडे घेऊन जाच. बेळगावातील अन्यायाविरुद्ध आवाज उठवा, मराठी माणसाला न्याय द्या, अशी मागणी सामना अग्रलेखात म्हटलं आहे.
दरम्यान, बेळगावातील मराठी माणसांवरील अत्याचार थांबत नसतील तर केंद्राने संपूर्ण सीमा भागास केंद्रशासित प्रदेश म्हणून जाहीर करावं, असंही सामना अग्रलेखात म्हटलं आहे.
महत्वाच्या घडामोडी –
“शरद पवारांनीच अनिल देशमुखांना तात्काळ घरी पाठवावं”
“अहमदनगरमध्ये भाजपला धक्का; ‘या’ मोठ्या नेत्यानं केला राष्ट्रवादीत प्रवेश”
…तर शिवसेनेची ‘ती’ प्रकरणं बाहेर काढेन; नितेश राणेंचा वरुण सरदेसाईंना इशारा
मोठी बातमी! सुशील कुमार शिंदे यांची मुलगी आणि जावयाची मालमत्ता ED कडून जप्त