Home महाराष्ट्र ‘…म्हणून दुःख भाजपला वाटत असेल’; जयंत पाटलांची टीका

‘…म्हणून दुःख भाजपला वाटत असेल’; जयंत पाटलांची टीका

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक हात वर करून मतमोजणी करुन होणार असल्याने कदाचित भाजपला यात घोडेबाजार करता येणार नाही, हे त्यांना दुःख वाटत असेल असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना लगावला आहे.

हे ही वाचा : “अमोल कोल्हेंनी देशाची माफी मागावी, अन्यथा…”

राज्यसभेने ज्या पद्धतीने निर्णय घेतलेला आहे, त्याच तंतोतंत पद्धतीने आम्ही विधानसभेत निर्णय घेतला आहे. विधानसभेच्या अध्यक्षपदाची निवडणूक हात वर करुन मतमोजणी करुन होणार आहे. हे दुःख भाजपला वाटत असेल. म्हणून लोकशाही, पारदर्शक व महाराष्ट्रातील जनतेच्यादृष्टीने अतिशय चांगला निर्णय विधानसभेतल्या नियमात बदल करुन महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे. याविरोधात भाजपचे लोक राज्यपालांकडे धाव घेत आहेत हे दुर्दैवी आहे. इथून पुढे अध्यक्षपदाची निवडणूक हात वर करुन उमेदवाराला पाठिंबा देत होणार आहे. पुढील काळासाठी देखील हीच पद्धत कायम राहील, याचे भाजपला दुःख वाटण्याचे कारण काय?, असं जयंत पाटील म्हणाले.

दरम्यान, भाजपने विधानसभा अध्यक्षांची निवड गुप्त मतदान पद्धतीने घ्यावी अशी मागणी केली होती, मात्र महाविकास आघाडी सरकार अध्यक्ष निवडीची निवडणूक ही हात वर करून मतदान घेऊन करण्यासाठी आग्रही असल्याचं दिसून आलं.

महत्वाच्या घडामोडी –

कोणत्या निकषावर मुख्यमंत्री टॉप फाईव्हमध्ये आले आहेत? चंद्रकांत पाटलांचा सवाल

मुंबई महापालिकेत भाजप-शिवसेना आमने-सामने; भाजप नगरसेवकांनी केलं दालनाबाहेरच 6 तास आंदोलन

अपक्षांच्या पाठिंब्यामुळे मंडणगड नगर पंचायतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता