मुंबई : महाराष्ट्रातील परप्रांतीय राज्याबाहेर गेले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या आहेत. या संधी महाराष्ट्रातील तरूणांपर्यंत पोहोचवाव्या. त्यामुळे राज्यातील तरुणांनाही रोजगार मिळेल, असा सल्ला मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिला आहे.
महाराष्ट्रातून जे परप्रांतीय बाहेर गेले आहेत ते परत येतील किंवा ज्यावेळी आणले जातील त्यावेळी त्यांची प्रथम तपासणी करावी, त्याशिवाय त्यांना परत घेऊ नये. संबंधित राज्यांमध्ये काय परिस्थिती आहे याची आपल्याला कल्पना नाही. आपल्याकडे चाचण्या होत असल्या तरी त्या ठिकाणी काय चाललंय याची आपल्याला कल्पना नाही, असं राज ठाकरे म्हणाले.
दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज करोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व पक्षीय नेत्यांची बैठक बोलवली होती. या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना राज ठाकरे यांनी ही प्रतिक्रिया दिली.
महत्वाच्या घडामोडी-
राज्याच्या इतिहासात प्रथमच असा विरोधी पक्ष आहे, जो महाराष्ट्राची बाजूच घेत नाही- संजय राऊत
फडणवीसजी, नाक घासून माफी मागा, नाहीतर…; राष्ट्रवादी काँग्रेसचा फडणवीसांवर निशाणा
कोणत्याही ठाकरेंबद्दल माझ्या मनात आकस नाही- नारायण राणे
17 मेनंतर सरकारची रणनीती काय?; सोनिया गांधींचा केंद्र सरकारला सवाल