Home देश 17 मेनंतर सरकारची रणनीती काय?; सोनिया गांधींचा केंद्र सरकारला सवाल

17 मेनंतर सरकारची रणनीती काय?; सोनिया गांधींचा केंद्र सरकारला सवाल

नवी दिल्ली : देशभरात करोना रुग्णांची संख्या वाढत चालल्यामुळे लॉकडाउनचा कालावाधी 17 मेपर्यंत वाढवण्यात आला. यावरुन  काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे.

7 मेनंतर काय आणि कशी वाटचाल असणार? 17 मेनंतर लॉकडाऊनबाबत मोदी सरकारची काय रणनीती आहे? असा सवाल सोनिया गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना केला आहे.

दरम्यान, आज सोनिया गांधी यांनी काँग्रेस शासित राज्यातील मुख्यमंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा केली. त्यावेळी त्यांनी हा प्रश्न उपस्थित केला. या बैठकीत माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते.

महत्वाच्या घडामोडी-

…त्यामुळे महसूल सोडा, आणि सामाजिक अंगाने विचार करा- चंद्रकांत पाटील

“तुम्ही महाराष्ट्राचे नागरिक असाल आणि परदेशात अडकला असाल तर…”; राज्य सरकारचं आवाहन

“आघाडीचं सरकार चालवणं ही तारेवरची कसरत”

मोदी सरकारच्या आर्थिक चुका दाखविण्यात काँग्रेस कमी पडली- पृथ्वीराज चव्हण