मुंबई : राज्यात 2019 ची विधानसभा निवडणूकीनंतर, मुख्यमंत्री पदावरून भाजप आणि शिवसेनेत मतभेद निर्माण झाले. दोन्ही पक्षातील संबंध इतके ताणले गेले की, नंतर शिवसेना भाजपपासून वेगळी झाली. याच पार्श्वभूमीवर, शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी भाजपापासून दूर जाण्याचं एक कारण सांगितलं आहे.
मागील ३० वर्षांपासून शिवसेना भाजपासोबत होती. शिवसेनेमुळे युती तुटली, हा आरोप चुकीचा आहे. टाळी कधीही एका हातानं वाजत नाही. भाजपाच्या वाईट काळात शिवसेना त्यांच्यासोबत राहिली. पण, भाजपाला सत्तेची लालची आहे. सत्तेसाठी ते आपल्या मित्र पक्षाचं बलिदान देऊ पाहत होते. त्यामुळे आज शिवसेना भाजपासोबत नाही, असं संजय राऊत म्हणाले.
दरम्यान, संजय राऊत यांनी आजतक या वृत्तवाहिनीशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.
महत्वाच्या घडामोडी
“सर्वाधिक कमाई करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत विराट एकटा क्रिकेटपटू”
देवेंद्र फडणवीसांचं मुख्यमंत्र्यांना पत्र; म्हणाले…
रूग्ण बरे होत आहेत हे दाखवण्याचा घाईत मृत्यूचे प्रमाणसुद्धा वाढतंय- देवेंद्र फडणवीस
मुंबई पोलिसांसाठी सलमान खानने केली ‘ही’ मोठी मदत; मुख्यमंत्र्यांनी मानले आभार