मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या दसरा मेळाव्यातील भाषणामुळे विरोधकांना चिलमीत जास्तीचा गांजा भरुन ‘दम मारो दम’ करावे लागले. विरोधकांच्या चिलमीतला गांजा कमी प्रतीचा होता हे त्यांच्या बेताल बडबडण्यावरुन स्पष्ट होते, अशी टीका शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सामनाच्या अग्रलेखातून केली होती. यावरून भाजप नेते नितेश राणे यांनी संजय राऊतांना प्रत्युत्तर दिलंय.
मालकाच्या घरीच ‘गांजाचा बादशाह’असल्यामुळे राऊतांना कमी आणि जास्त प्रतीचा गांजा कसा असतो हे चांगले कळते. गांज्यावर इतके प्रेम बर नाही. अशी खोचक टीका नितेश राणे यांनी ट्विट करत केली.
हे ही वाचा : उत्तराखंडमध्ये भाजपला धक्का; सहा आमदारांचा लवकरच काँग्रेसमध्ये प्रवेश
दरम्यान राज्यात भाजपने सत्ता गमावून दोन वर्ष झाली आहे. त्या धक्क्यातून त्यांनी सावरायला हवे. भाजपचे लोक दसरा मेळाव्यानंतर ज्या बेधुंद पद्धतीने शिमगा करीत आहेत, ते बरे नाही. हे लोक नशेत वगैरे बोलत आहेत काय त्याचा तपास व्हावा, अशी मागणी राऊत यांनी सामनाच्या अग्रलेखातून केली होती.
मालकाचा घरीच “गांजाचा बादशाह” असल्या मुळे राऊतांना कमी आणि जास्त प्रतीचा गांजा कसा असतो हे चांगले कळते..
गांज्यावर इतके प्रेम बर नाही..@rautsanjay61— nitesh rane (@NiteshNRane) October 18, 2021
महत्वाच्या घडामोडी –
“देशाला राज ठाकरेंसारख्या नेत्याची गरज, ते जे बोलतात ते करतात”
शिवसेनेचे 12 तर राष्ट्रवादीचे अनेक आमदार भाजपच्या संपर्कात ; ‘या’ माजी मंत्र्याचा दावा
हिंदुराष्ट्र मजबूत करण्याचा राज ठाकरेंनी केला निर्धार; राज ठाकरे अयोध्या दौऱ्यावर जाणार