मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जातीच्या राजकारणाच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादीवर टीका केली होती. राष्ट्रवादीच्या उदयानंतर राज्यात जातीयवाद वाढला, असं राज ठाकरे यांनी म्हटलं होतं. यावर राष्ट्रवादीचे नेते व ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी प्रतिक्रिया दिली.
राज ठाकरे यांनी शरद पवारांसोबत ‘लाव रे तो व्हिडीओ’ हा कार्यक्रम घेतला होता, तेंव्हा पवारांसोबत ते दौरे करत होते. तेंव्हा त्यांना पवारांबद्दल कळलं नाही का?, असा सवाल हसन मुश्रीफ यांनी यावेळी केला. ते टी.व्ही.9 मराठीशी बोलत होते.
राज यांना भाजपसोबत सलगी करायची आहे. पण त्यांनी परप्रांतियांबाबत जी भूमिका मांडलेली आहे. त्यावर भाजप आडून बसला आहे. ते धुवून काढण्यासाठीच ते राष्ट्रवादीला टार्गेट करत असावेत. त्यांनी एकत्र यावेत, दोघांनी एकत्र संसार करावा पण राष्ट्रवादीला बदनाम करण्याची गरज काय?, असा प्रश्नही हसन मुश्रीफांनी यावेळी केला.
महत्वाच्या घडामोडी –
“नीलम गोऱ्हेंना शिवसेनेत मी आणलं, माझ्यावर टीका करुन कदाचित त्यांना मंत्रीपद मिळेल”
सांगली जिल्ह्यात काँग्रेसला खिंडार; काँग्रेस कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश
नारायण राणे म्हणजे दुतोंडी साप; नीलम गोऱ्हेंचा राणेंवर हल्लाबोल