आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : राज्याचे विरोधी पक्षनेते यांनी नवी मुंबईतील एका कार्यक्रमात बोलताना, जनतेने मला कधीच जाणवू दिलं नाही की मी मुख्यमंत्री नाही. मी आजही मुख्यमंत्री आहे असेच मला वाटते, असं म्हटलं होतं. फडणवीसांच्या या वक्तव्यानंतर राज्यातील राजकीय चर्चांना उधाण आलंय. यावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली.
हे देखील वाचा : ठाकरे सरकारची ऐट राजाची, वागणूक भिकाऱ्याची- सदाभाऊ खोत
‘माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आमचे चांगले मित्र आहेत. त्यांच्याबद्दल फार काही बोललेच पाहिजे, असे नाही. पूर्वी फडणवीसांना पहाटे स्वप्न पडायची. पण आता तर त्यांना दिवसाही स्वप्न पडत आहेत, हे काही बरोबर नाही, असा टोला नाना पटोलेंनी फडणवीसांना लगावला.
दरम्यान, यावेळी बोलताना पटोलेंनी अतिवृष्टीमुळं शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीबाबतही भाष्य केलं. आजच्या परिस्थितीत राज्य सरकारजवळ जे काही आर्थिक स्रोत आहेत, त्या आधारावर शेतकऱ्यांची दिवाळी चांगली जावी, याची व्यवस्था सरकारने केलेली आहे. झालेल्या नुकसानाची भरपाई 15 हजार कोटी आहे आणि ती केंद्र सरकारची जबाबदारी आहे. आतापर्यंत केंद्राने महाराष्ट्राचे केलेले नुकसान जनतेने पाहिले आहे, असं पटोले म्हणाले.
महत्वाच्या घडामोडी –
मनसेसोबत युती बाबत देवेंद्र फडणवीसांचं स्पष्टीकरण; म्हणाले…
उद्या होणारा दसरा मेळावा हा कोणत्याही जाती किंवा वर्गाचा नाही- पंकजा मुंडे
…तर आज शिवसेनेचे 56 आमदार भाजपमध्ये असते; गुलाबराव पाटलांचा मोठा गाैफ्यस्फोट