मुंबई : गेल्या महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळ विस्तारात महाराष्ट्रातील चार नेत्यांना संधी देण्यात आली. त्यामध्ये, अग्रक्रमाने नारायण राणेंना थेट कॅबिनेट मंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आली. त्यामुळे, शिवसेनेला शह देण्यासाठीच भाजपाने राणेंना मंत्रिपद दिल्याची चर्चा राज्याच्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. यासंदर्भात आता माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनीही आपले मत व्यक्त केले.
केंद्रात गडकरींकडे असलेलं खातं काढून ते नारायण राणेंना देण्यात आलं. हा मोठा सिग्नल दिला गेला आहे. तसेच, शिवसेनेसोबत तडजोड करण्याचा भाजपाने प्रयत्न केला; पण तो फसला गेल्याने राणेंना मंत्रिपद देण्यात आले असावे, असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले आहेत.
नारायण राणेंना कोण सांगणार, पण भाषा वापरताना संयम राखायला हवा. आपली एक राजकीय संस्कृती आहे, त्याच्या पलीकडे कोणी जाऊ नये. आपली काही तक्रार असेल तर मुख्यमंत्र्यांकडे केली पाहिजे, मुख्य सचिवांकडे केली पाहिजे, असं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, आमच्या मंत्रिमंडळात असताना राणे उद्योग खाते सांभाळत होते, अनेक कमिट्या त्यांच्याकडे होत्या, ते तेव्हा आमचेही सहकारी होते. माझ्यासोबत ते चांगलेच वागत होते, असंही पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट केले.
महत्वाच्या घडामोडी –
“अशोक चव्हाण आणि महाविकास आघाडीची अवस्था नाचता येईना, अंगण वाकडं अशी झालीये”
“शेगाव संस्थानचे विश्वस्त शिवशंकर भाऊ पाटील यांचं दु:खद निधन”
मोठी बातमी! आरक्षणासंदर्भात केंद्राचा मोठा निर्णय; आरक्षणाचा अधिकार राज्यांना मिळणार
रोहित पवारांच्या ‘त्या’ फोनची कोल्हापूरमध्ये चर्चा