आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
जळगाव : राज्यसभा निवडणुकीत भाजपनं महाविकास आघाडीला मोठा धक्का देत आपले सर्व उमेदवार निवडून आणत विजय साजरा केला. यावरून भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यांवर निशाणा साधला होता.
उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राला दहा वर्षे पाठिमागे नेलं आणि राज्यसभेच्या पराभवामुळे त्यांची नाच्चकी झाली, असं राणे म्हणाले होते. यावरून आता शिवसेना नेते व जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
हे ही वाचा : उद्धव ठाकरेेंनी सत्तेतून बाहेर पडून, मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला पाहिजे- रामदास आठवले
एका पराभवामुळे नाच्चकी झाली असेल तर नारायण राणे दोन वेळा पराभूत झाले होते. मग त्याचं काय झालं, याचा त्यांनी विचार करावा, असा जोरदार पलटवार गुलाबराव पाटलांनी यावेळी केला.
राज्यसभेची एक जागा पराभूत झाल्याने राज्याच्या विकासात काय फरक पडणार आहे? राणे यांच्या बोलण्याचा अर्थ मला समजत नाही, त्यांनी त्यांच्या बोलण्याचा अर्थ मला समजावून सांगावा, अशी अपेक्षा व्यक्त करतो, असा उपरोधक टोलाही गुलाबराव पाटलांनी यावेळी राणेेंना लगावला.
महत्त्वाच्या घडामोडी –
“आगामी निवडणूकीच्या आधी मनसेकडून शिवसेनेला मोठे खिंडार, अनेक शिवसैनिकांनी केला मनसेत प्रवेश”
2024 ला कोल्हापूरातून संजय पवार आमदार असतील फक्त शिवसेनेनं त्यांना…; तृप्ती देसाईंचं मोठं विधान
‘…या ठिकाणी झाली भाजप- मनसेची पहिली युती’; राष्ट्रवादीचं वर्चस्व असलेल्या सोसायटीवर मिळविली सत्ता