Home महाराष्ट्र “…म्हणून मनसेने उडविली शिवसेनेची खिल्ली”

“…म्हणून मनसेने उडविली शिवसेनेची खिल्ली”

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

अहमदनगर : नगर महापालिकेवर शिवसेनेची सत्ता आहे. मात्र शिवसेनेतील अंतर्गत पुन्हा चव्हाट्यावर आल्याचे चित्र दिसत आहे. नगरमध्ये रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत असून याचा विरोध करण्यासाठी शिवसैनिकच आंदोलन करत रस्त्यावर उतरले. यावरून मनसेने शिवसेनेची खिल्ली उडविली आहे.

महापालिकेतील सत्ताधारी शिवसैनिकच आंदोलन करत असतील तर हे हास्यास्पद आहे. त्याची तातडीने दखल घेऊन शिवसेना नेत्या, महापौर रोहिणी शेंडगे यांनीच राजीनामा द्यायला हवा, असं म्हणत मनसेचे पदाधिकारी नितीन भुतारे यांनी शिवसेनेवर टीका केली आहे.

दरम्यान, हा प्रकार शहराच्या विकासासाठी कारणीभूत ठरेल. नगरमधील नागरिकांनी सर्वात जास्त नगरसेवक शिवसेनेचे निवडून दिले. मात्र अंतर्गत गटबाजीमुळे जर शिवसेनेचे काही नगरसेवक आंदोलनाच्या पवित्र्यात असतील तर शिवसेनेच्या महापौर रोहिणी शेंडगे यांना महापौर पदावर राहण्याचा कुठलाही नैतिक अधिकार राहत नाही, असं नितीन भुतारे म्हणाले आहेत.

महत्वाच्या घडामोडी –

माझ्यावरचे आरोप सिद्ध करा, उद्याच राजीनामा देतो, खड्ड्यात गेलं राजकारण; बच्चू कडू आक्रमक

उद्धव ठाकरेंच्या बेईमानीचा निकाल आज लागला; नवनीत राणांचा हल्लाबोल

“BREAKING! एकनाथ खडसे पुन्हा एकदा बाॅम्बे रूग्णालयात दाखल”

“पालघर जिल्हा परिषदेत मनसेनं विजयी खातं उघडलं; तृप्ती पाटील यांचा दणदणीत विजय”