मुंबई : मुंबईत बेकायदेशीररित्या राहणाऱ्या पाकिस्तानी आणि बांगलादेशी घुसखोरांविरोधात आज मनसेनं मोर्चा काढला. यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आझाद मैदानावर मनसेच्या कार्यकर्त्यांना संबोधित केलं
नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात मोर्चे काढणाऱ्यांना आज आम्ही फक्त मोर्चा काढून प्रत्युत्तर दिले आहे. मात्र, यापुढे जास्त नाटकं कराल तर दगडला दगडाने आणि तलवारीला तलवारीने प्रत्युत्तर देऊ, अशी गर्जना राज ठाकरे यांनी केली.
यावेळी राज ठाकरे यांनी केंद्र सरकारच्या नागरिकत्व सुधारणा कायदा आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणीचे समर्थन केले. केंद्र सरकारने हे दोन्ही कायदे देशभरात तात्काळ लागू करायला पाहिजेत. जेणेकरून एकदाचा काय तो सोक्षमोक्ष होईल, असं राज ठाकरे म्हणाले.
CAA विरोधात मुस्लिम समाजाकडून काढण्यात येणाऱ्या मोर्चांचा मला अर्थच लागत नाही. देशभरात CAA किंवा NRC कायदा लागू झाला तरी जन्मापासून येथे राहणाऱ्यांना कोण बाहेर काढणार? मग मुस्लिम समाज मोर्चे काढून कोणाला आपली ताकद दाखवू पाहत आहे, असा सवालही राज ठाकरे यावेळी केला.
महत्वाच्या घडामोडी-
अजित पवार थोड्या दिवसांनी शिवसेनाही चालवतील- मनसेचा शिवसेनवर पलटवार
“असा फुकटचा धंदा राज्य सरकारने करू नये”
त्यामुळे माझ्यावर कमळ बघण्याचे संस्कार नाहीत- शरद पवार
…म्हणून मी दिल्लीत जाणार नाही- देवेंद्र फडणवीस