‘…त्यामुळे माझ्यावर राजीनामा देण्याची वेळ आली’; नितीश कुमार यांची प्रतिक्रिया

0
371

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

नितीश कुमार यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला असून नितीश कुमार पुन्हा भाजपसोबत घरोबा करणार आहेत. नितीश यांनी भाजपला पाठिंब्याचं पत्र देऊन सरकार स्थापनेची चर्चा केली आहे. यानंतर नवं सरकार स्थापनेच्या हालचाली सुरू झाल्याचं दिसत आहे.

नितीश कुमार आज नवव्यांदा बिहारचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. तसेच गेल्या पाच वर्षांत तिसऱ्यांदा ते शपथ घेणार आहेत.

ही बातमी पण वाचा : सर्कशीतल्या जोकरप्रमाणे…; मनसेची सदावर्तेंवर सडकून टीका

आम्ही महागठबंधनशी नातं तोडलं आहे, असं नितीश कुमार यांनी राजीनामा दिल्यानंतर माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे. त्यामुळे इंडिया आघाडीला मोठा सुरूंग लागला आहे.

राज्यकारभार योग्य रितीने चालत नव्हता. त्यामुळे माझ्यावर राजीनामा देण्याची वेळ आली. आम्ही आधीही भाजपबरोबर युती केली होती. ती युती तोडून राजदबरोबर आघाडी बनवली. पण इथे येऊनही काही सुरळीत चालत नव्हतं. आमच्या लोकांना त्रास होत होता. ते मेहनत घेत होते. परंतु, काही गोष्टींचं त्यांना वाईट वाटत होतं. त्यामुळे मी या निर्णयापर्यंत पोहोचलो, असं नितीश कुमार म्हणाले आहेत.

महत्त्वाच्या घडामोडी – 

 …म्हणून ‘ते’ गुन्हे मागे घेता येणार नाही; मनोज जरांगेंच्या मागणीवर फडणवीसांचं थेट विधान

‘मराठा आरक्षणावर राज्यपालांचं मोठं वक्तव्यं, म्हणाले…’

‘मराठा आरक्षणावर राज्यपालांचं मोठं वक्तव्यं, म्हणाले…’

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here