आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : राज्यातील सत्तासंघर्षाच्या नवव्या दिवशी उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. या पार्श्वभूमीवर आता काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.
काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी ट्विट करत पहिली प्रतिक्रिया दिली आहे. मविआच्या कल्पनेची अभावितपणे सुरुवात माझ्या मुखातून झाली. त्यामुळे हे सरकार जाण्याचे दुःखही फार आहे, असं सचिन सावंत यांनी म्हटलं आहे.
हे ही वाचा : उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिल्यानंतर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
दरम्यान, वैचारिक मतभेद असतानाही लोकशाहीवर भाजपाचे संकट पाहून सरकार स्थापन केले होतं. या संकटाने आता फॅसिझमचे भयानक रुप घेतले आहे. विरोधी पक्षातून देश वाचवण्याचा लढा अधिक तीव्र करावा लागेल, असंही सचिन सावंत म्हणाले आहेत.
मविआच्या कल्पनेची अभावितपणे सुरुवात माझ्या मुखातून झाली त्यामुळे हे सरकार जाण्याचे दुःख ही फार आहे. वैचारिक मतभेद असतानाही लोकशाहीवर भाजपाचे संकट पाहून सरकार स्थापन केले गेले. या संकटाने आता फॅसिझमचे भयानक रुप घेतले आहे. विरोधी पक्षातून देश वाचवण्याचा लढा अधिक तीव्र करावा लागेल https://t.co/sQfcMrOxZe
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) June 29, 2022
महत्त्वाच्या घडामोडी –
भाजपाचा घोषणाबाजी करत जल्लोष; देवेंद्र फडणवीसांचा केला जयजयकार
उद्धव ठाकरेंवर रादीनामा देण्याची वेळ संजय राऊत यांच्यामुळे आली- दीपक केसरकर
महाराष्ट्रानं एक सुसंस्कृत मुख्यमंत्री गमावला; उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यावर संजय राऊतांचं ट्विट