Home महत्वाच्या बातम्या …तर 105 आमदारांचे 50 व्हायला वेळ लागणार नाही- एकनाथ खडसे

…तर 105 आमदारांचे 50 व्हायला वेळ लागणार नाही- एकनाथ खडसे

मुंबई : भाजपानं विधान परिषद निवडणुकीसाठी उमेवारांची घोषणा केल्यानंतर एकनाथ खडसे यांची नाराज दडून राहिली नाही. उमेदवारांच्या नावांची घोषणा झाल्यानंतर त्यांनी आपली भूमिका मांडली होती. त्यानंतर मंगळवारी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत खडसे यांनी पक्षातील नेत्यांवर संताप व्यक्त केला.

विरोधी पक्षात एकटं असताना 123 आमदार निवडून आणले. महाराष्ट्रात भाजपचा मुख्यमंत्री आणला आणि सत्ता, पैसा सगळं असून 105 आमदार आले. या प्रवृत्तीमुळे 105 आमदार आले. विरोधी पक्षात बसायची वेळही याच कारणामुळे आली. पुढे कष्टानं जावं लागणार आहे, नाहीतर 105 आमदारांचे 50 आमदार व्हायला वेळ लागणार नाही, असं म्हणत एकनाथ खडसे यांनी भाजप नेत्यांवर टीका केली आहे.

दरम्यान, लोकशाही पद्धत आता भाजपात राहिलेली नाही, असा आरोपही एकनाथ खडसे यांनी केला आहे.

महत्वाच्या घडामोडी-

लोकशाही पद्धत आता भाजपात राहिलेली नाही- एकनाथ खडसे

आपल्याला नियमांचं पालन करुन या युद्धाचा सामना करायचा आहे- नरेंद्र मोदी

भाजपाने ऐनवेळी बदलला विधानपरिषद उमेदवार; पंकजा मुंडेंच्या ‘या’ कट्टर समर्थकला उमेदवारी

तुमचा भाऊ म्हणून मी सदैव तुमच्यासोबत; जयंत पाटलांचं परिचारिकांना भावनिक पत्र