आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर | शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत युती करून राज्यामध्ये सरकार स्थापन केलं, यानंतर राज्यात शिंदे गटाविरूद्ध ठाकरे गट झाला आहे. यानंतर दरवर्षीप्रमाणे यंदाचा दसरा मेळावा कोणाचा होणार, याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. यावर आता केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी भाष्य केलं आहे.
उद्धव ठाकरे यांच्या दसरा मेळाव्याला तुम्ही जाणार का? असा प्रश्न राणे यांना पत्रकारांनी विचारला असता, यावर राणेंनी उत्तर दिलं. उद्धव ठाकरेंनी जर मला आमंत्रण दिलं तर मी दसरा मेळाव्याला जाईल, असं राणे म्हणाले. मात्र उद्धव ठाकरे मला आमंत्रण देणार नाहीत, हे माहिती आहे, असंही राणेंनी यावेळी सांगितलं.
हे ही वाचा : शिंदे गट आणि ठाकरे गट येणार आमने-सामने; या ठिकाणी होणार पहिली निवडणूक
दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या दसरा मेळाव्याला जाणार का? असा सवालही पत्रकारांनी विचारला असता, त्यावरही राणेंनी तेच उत्तर दिलं. एकनाथ शिंदे यांनी आमंत्रण दिलं तर मी जरूर जाईल, असं राणे म्हणाले.
महत्त्वाच्या घडामोडी –
शिवसेनेत पक्षप्रवेशाचे वादळ; औरंगाबादेत विविध पक्षातील असंख्य कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश
एकनाथ खडसे पुन्हा स्वगृही परतणार?; गिरीश महाजनांनी केला मोठा दावा, म्हणाले…
खासदार धैर्यशील मानेंना माजी खासदार केल्याशिवाय शांत बसणार नाही; शिवसेनेच्या नेत्याचा इशारा