…तर मी आत्महत्या करेन; रावसाहेब दानवेंना जावायाची धमकी

0
179

औरंगाबाद : भाजपाचे नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि त्यांचे जावई हर्षवर्धन जाधव यांच्यातील वाद पुन्हा उफाळून आला आहे. रावसाहेब दानवे यांच्यावर जावाई हर्षवर्धन जाधव यांनी पुन्हा एकदा गंभीर आरोप केले आहेत.

रावसाहेब दानवे हेच माझ्यावर खोटे गुन्हे दाखल करून त्रास देत आहेत. मला जगू द्या आणि तुम्हीही जगा… पुन्हा जर मला त्रास देण्याचा प्रयत्न केला तर मी आत्महत्या करेल आणि तुम्हाला अडछणीत आणीन अशी धमकी माजी आमदार आणि रावसाबेर दानवेचे जावाई हर्षवर्धन जाधव यांनी दिली आहे. जाधव यांनी यूट्यूबवर एक व्हिडिओ प्रसिद्ध करून दानवेंना घरचा आहेर दिला आहे.

तुम्हाला वाटतं हा फार फडफड करतो, कुठेही धरून याला कापून टाकू पण मी तुमचे छक्के-पंजे असणारे व्हिडिओ काढले आहेत आणि अनेक वरिष्ठ वकिलांना पाठवले आहेत. मला तुम्ही मारलं किंवा मी आत्महत्या केली, तर तुम्ही वाचणार नाही, इतकं लक्षात ठेवा, असं हर्षवर्धन जाधव यांनी व्हिडिओ मध्ये म्हटलं आहे

दरम्यान, या व्हिडिओने महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजण्याची शक्यता आहे.

महत्वाच्या घडामोडी –

देवेंद्र फडणवीस यांना मी ‘ही’ तीन पुस्तकं भेट देणार- हसन मुश्रीफ

हे सरकार आपोआप कोसळेल; देवेंद्र फडणवीस यांचा ठाकरे सरकारवर निशाणा

चंद्रकांत पाटील यांनी तात्काळ जनतेची माफी मागावी- सचिन सावंत

महाराष्ट्र गद्दारांना माफ करत नाही; जितेंद्र आव्हाडांचा भाजपावर हल्लाबोल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here