मुंबई : पुण्यात राहणाऱ्या टिकटाॅकस्टार पूजा चव्हाण या 22 वर्षीय तरूणीनं पुण्यातील एका इमारतीच्या पहिल्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केली होती. यानंतर विरोधकांच्या आक्रमक भूमिकेनंतर शिवसेना नेते आणि वनमंत्री संजय राठोड यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. यावरून आता संजय राठोड यांनी राजीनाम्या बाबतचा खुलासा केला आहे.
मंत्रीपदाचा राजीनामा देण्यासाठी माझ्यावर कोणाचाही दबाव नव्हता. परंतु, शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रतिमा मलिन होणार नाही, याची दक्षता घेऊन मी स्वत:हून राजीनामा दिला, खुलासा संजय राठोड यांनी यावेळी केला.
दरम्यान, सोलापूर येथील आयोजित केलेल्या सभेत संजय राठोड बोलत होते. मागील 30 वर्षापासून मी राजकारणात सक्रिय आहे. मात्र अद्याप बंजारा समाजाला न्याय मिळालेला नाही. आमच्या काही मागण्या आहेत. त्यासाठी मी मुख्यमंत्र्यांकडे वेळ मागितला आहे. लवकर त्यांची भेट घेऊन आमच्या व्यथा मांडू, असंही संजय राठोड यांनी यावेळी म्हटलं.
महत्वाच्या घडामोडी –
ओबीसी आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी वांझोट्या बैठका घेतल्या- चंद्रशेखर बावनकुळे
“भाजपने संपूर्ण भारतालाच अपयशी ठरवलंय, त्यामुळे CM नाही, PM बदला”
“…त्यामुळे महिला सुरक्षा वाऱ्यावर”; प्रविण दरेकरांचा राज्य सरकारवर घणाघात
‘औकातीच्या बाहेर घोषणा करायची अन्…’; अतुल भातखळकरांचा संजय राऊतांना टोला