मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कानाखाली लगावण्याचं वक्तव्य करणारे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अखेर अटक झाली. मात्र काल रात्री उशिरा राणेंचा जामीन मंजूर झाला. यानंतर राज्यातील राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.
नारायण राणेंना 17 सप्टेंबर पर्यंत दिलासा दिला आहे. पुढील सुनावणीपर्यंत कोणतीही कारवाई करणार नाही, अशी ग्वाही सरकारने मुंबई उच्च न्यायालयात दिली आहे. नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेत उत्तरं दिली.
मी काय असो बोललो होतो, ज्याचा इतका राग आला. मला राजकारणाला 52 वर्ष झाली. आज शिवसेनेने असे शब्द कधी उच्चारले नाहीत काय?, असा सवाल नारायण राणेंनी यावेळी केला. तसेच मला माझ्या राष्ट्राचा अभिमान आहे, म्हणून मी ते वक्तव्य केलं, असं राणे म्हणाले.
महत्वाच्या घडामोडी –
“किरीट सोमय्या यांनी राजकारण सोडून, ज्योतिषीचा धंदा सुरू करावा”
देश कायद्याने चालतो, दोन्ही निकाल माझ्या बाजूनेच- नारायण राणे
“नारायण राणे सत्तेच्या जोरावर तत्वज्ञान पाजळत होते, कालच्या प्रकाराने त्यांची गुर्मी उतरवली”
राज्यामध्ये आता राष्ट्रपती राजवट हा एकच मार्ग- नितेश राणे