…म्हणून मी मंत्रालयात जात नाही- उद्धव ठाकरे

0
176

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर विरोधक नेहमी ते मंत्रालयात जात नाहीत, असे आरोप करतात. यावर मुख्यमंत्री ठाकरे यांनी उत्तर दिलं आहे.

शिवसेनेचे खासदार आणि ‘सामना’चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी घेलेल्या विशेष मुलाखतीमध्ये उद्धव ठाकरे यांनी याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मी अनेक ठिकाणी एकच वेळेला पोहचू शकतो तर ते का वापरु नये?, असा प्रश्नच उद्धव ठाकरे यांनी टीकाकारांना केला आहे.

संजय राऊत यांनी अनलॉक्ड मुलाखतीत मुख्यमंत्र्यांना, ‘कोरोना काळात तुम्ही मंत्रालयामध्ये कमीत कमी वेळा गेलात, असा आपल्यावर सतत आरोप होतो याबद्दल काय सांगाल?, असा प्रश्न विचारला असता, यावर मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, मंत्रालय आता बंद आहे. आज तंत्रज्ञान एवढं प्रगत झालं आहे. तुम्ही त्याचा योग्य वापर करु शकत नसाल तर तुमच्यासारखे दुर्भाग्य असणारे तुम्हीच आहात, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

दरम्यान, विदर्भातील सर्व जिल्हाप्रमुखांची बैठक मी व्हिडीओ कॉन्फरन्सवरुन घेतली. महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांच्या आमदारांची एक व्हिडीओ कॉन्फरन्स झाली. म्हणजे एका वेळेस घरात बसून मी सगळीकडे जाऊ शकतो. मी पूर्ण राज्य कव्हर करतोय आणि निर्णय घेतोय, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी-

त्यांनी त्यांचा जो महाराष्ट्राचा फंड आहे तो दिल्लीत दिल्ल्याने…; उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला

शाळा आता नाही, पण…; मुख्यमंत्र्यांनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय

हॉस्पिटलचं बिल आधी ऑडिटरकडे मग…; आरोग्यमंत्र्यांची मोठी घोषणा

“…तर आपत्ती व्यवस्थापन कायदा वापरण्याची वेळ आणू नये; शरद पवारांचा डॉक्टरांना इशारा”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here