मुंबई : राज्य सरकार बदल्या करणं हा एकमेव धंदा करतंय, असा आरोप माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
बदल्यांमध्ये आम्ही बिझी आहोत असे ते बोलतायत, तर मग आम्हीही म्हणतो की, राज्य अडचणीत असताना विरोधी पक्षनेते बिहार निवडणुकीत कसे काय लक्ष घालू शकतात? त्यांना राजकीय स्टेटमेंट करण्याची सवय आहे, असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, कोल्हापुरात पूर असताना कर्नाटकची चूक झाली होती, तसं त्यांनी कबूल केलं आहे. आता पूर्व विदर्भातील पुराबाबत एमपी सरकारने विश्वासात घेतले नसल्याचे दिसत आहे, असंही रोहित पवार यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या घडामोडी-
भाजप सरकार म्हणजे नापास विद्यार्थ्यांचा वर्ग; ‘या’ काॅंग्रेस प्रवक्त्याचा टोला
भारताचा चीनला आणखी एक दणका; PUBG आणि LUDO सह 118 अॅप्सवर बंदी
मशिद उघडून नमाज अदा करणार; इम्तियाज जलीलांची मोठी घोषणा
राज्य सरकार डोक्यावर पडल्यासारखं काम करतय; निलेश राणेंची टिका