…तर एकनाथ खडसेंचे जावई आत्महत्या करतील; शरद पवारांचं मोठं विधान

0
394

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आमदार एकनाथ खडसे यांच्या जावयांबद्दल बोलताना एक मोठा दावा केला आहे.

जर सव्वा दोन वर्षांपासून जेलमध्ये असलेले खडसेंचे जावयांच्या खटल्याबाबत निकाल आला नाही तर त्यांचे जावई आत्महत्या करतील, असा धक्कादायक दावा शरद पवारांनी यावेळी केला. राष्ट्रवादी काँग्रेसचं विभागीय कार्यकर्ता शिबिर आज मुंबईत पार पडलं. यावेळी ते बोलत होते.

ही बातमी पण वाचा : “…तर अजित पवार मुख्यमंत्री होऊ शकतात”; भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य

दरम्यान, माझी आजच जळगावला काही सहकाऱ्यांशी चर्चा झाली. एकनाथ खडसे हे आपले सहकारी आहेत. ते आधी भाजपमध्ये होते. त्यांनी भाजप सोडली आणि त्यांच्यावर खटला दाखल झाला. त्यांच्या जावयाला अटक करण्यात आली. आज सव्वा दोन वर्ष झाली, त्यांच्या जावायाचा खटला कोर्टात आहे. मला अशी माहिती मिळाली की, त्यांच्यासोबत अन्य सहकारी जे तुरुंगात होते त्यांनी स्पष्ट सांगितले की, जर आमच्यावर लावलेली खोटी केस मागे घेतली नाही तर किंवा निकाल लवकर लागला नाही आम्ही आत्महत्या करू. अशी अवस्था कायम राहणार असेल तर खडसेंचे जावई आत्महत्या करतील, असा खबळजनक दावा शरद पवार म्हणाले.

महत्त्वाच्या घडामोडी –

“रवींद्र जडेजाच्या फिरकीसमोर हैदराबाद फलंदाजांचे लोटांगण, चेन्नईचा हैदराबादवर 7 विकेट्सने दणदणीत विजय”

…तर उद्धव ठाकरे आज मुख्यमंत्री असते; अजित पवारांचं मोठं विधान

“रायगडमध्ये ठाकरेंचा डंका वाजणार, ‘या’ मोठ्या नेत्याची कन्या हाती बांधणार शिवबंधन”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here