Home पुणे …तर उद्धव ठाकरे आज मुख्यमंत्री असते; अजित पवारांचं मोठं विधान

…तर उद्धव ठाकरे आज मुख्यमंत्री असते; अजित पवारांचं मोठं विधान

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

पुणे : शिवसेनेसोबत बंडखोरी करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत हात मिळवणी करून सरकार स्थापन केलं. यामुळे उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. आणि महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं. मात्र हे बंड नेमकं कशामुळं झालं, हा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. अशातच आता राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी या बंडावर मोठं विधान केलं आहे.

जेंव्हा अजित पवार आणि फडणवीस यांनी शपथ घेतली, तेव्हा तिन्ही पक्षांनी आमदारांना एकत्र ठेवलं होतं, तेवढं काम जर उद्धव ठाकरे यांनी केलं असतं, तर आज ते मुख्यमंत्री राहिले असते. हे फॅक्ट आहे, असं मोठं विधान अजित पवार यांनी यावेळी केलं. पुण्यात दैनिक सकाळ समुहाच्या वतीने अजित पवार यांची प्रकट मुलाखत घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते.

ही बातमी पण वाचा : “रायगडमध्ये ठाकरेंचा डंका वाजणार, ‘या’ मोठ्या नेत्याची कन्या हाती बांधणार शिवबंधन”

उद्धव ठाकरे यांच्यावर प्रचंड दबाव होता, आपल्या जीवाभावाचे सहकारी आपल्याला इतक्या मोठ्या संख्येनं सोडून जातील असं त्यांना वाटलं नव्हतं, हा मोठा धक्का होता. आधी 15-16 आमदार सोडून गेले. नंतर बरेच आमदार हे मातोश्रीवर होते. गुलाबराव पाटील, दिलीप लांडे, दीपक केसरकर, उदय सामंत यांना आम्ही पाहिलं, त्यांना एकत्र ठेवण्याचे काम झालं नाही. जेव्हा अजित पवार आणि फडणवीस यांनी शपथ घेतली, तेव्हा तिन्ही पक्षांनी आमदारांना एकत्र ठेवलं होतं, तेवढं काम जर उद्धव ठाकरे यांनी केलं असतं, तर आज ते मुख्यमंत्री राहिले असते. हे फॅक्ट आहे, असं अजित पवार म्हणाले.

महत्त्वाच्या घडामोडी –

राज्य सरकारला मोठा धक्का; मराठा आरक्षण पुनर्विचार याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली

सह्याद्री अतिथीगृहावर खलबतं; राज ठाकरेंनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, पडद्यामागे काय घडतंय?

मनसेला मोठा हादरा; ‘या’ नेत्याने दिला राजीनामा