Home महाराष्ट्र …तर 48 तासांमध्ये मातोश्रीवर येऊन दाखवाच; सुषमा अंधारेंचं, बावनकुळेंना ओपन चॅलेंज

…तर 48 तासांमध्ये मातोश्रीवर येऊन दाखवाच; सुषमा अंधारेंचं, बावनकुळेंना ओपन चॅलेंज

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : ठाण्यात ठाकरे गटाच्या महिला पदाधिकाऱ्याला शिंदे गटाच्या महिला पदाधिकाऱ्यांकडून मारहाण करण्यात आली. या हल्यात जखमी झालेल्या रोशनी शिंदे यांची शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी इस्पितळात जाऊन भेट घेतली. त्यानंतर पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनी शिंदे गट, भाजप तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार निशाणा साधला.

उद्धव ठाकरेंनी, फडणवीसांचा ‘फडतूस गृहमंत्री’ असा उल्लेख करत गृह मंत्रीपद झेपत नसेल तर राजीनामा द्या, अशी मागणी उद्धव ठाकरेंनी यावेळी केली. यावरून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाणा साधत इशारा दिला होता.

हे ही वाचा :  …त्यामुळे उद्धव ठाकरे तुरूंगात जाणार?; नारायण राणेंचं मोठं विधान

उद्धव ठाकरेंनी फडणवीसांबाबत पुन्हा असं काही विधान केल्यास , त्यांना मातोश्रीबाहेर पडू देणार नाही, असा इशारा बावनकुळेंनी यावेळी दिला होता. यावरून आता ठाकरे गटाच्या फायरब्रँड नेत्या सुषमा अंधारे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

बावनकुळे साहेब ज्या जोशात तुम्ही बोलला, याचा अर्थ संघटना तुमचं ऐकतंय. भाजपमध्ये तुमचा दबदबा आहे. मला तुम्हाला एकच प्रश्न विचारायचा आहे, तुमची इतकी हिंमत आहे मग तुमचं तिकीट फडणवीस यांनी का कापलं? तरीही त्यांचं म्हणणं असेल मातोश्रीच्या बाहेर पडू देणार नाही. तर तुम्हाला आव्हान देते, हिंमत असेल तर 48 तासांवर मातोश्रीवर या, असं आवाहन सुषमा अंधारेंनी यावेळी बावनकुळेंना दिलं.

दरम्यान, रोशनी शिंदे मारहाण प्रकरणी महाविकास आघाडीने ठाण्यात महामोर्चा काढला. यावेळी त्या बोलत होत्या.

महत्त्वाच्या घडामोडी 

“राष्ट्रवादीची मोठी खेळी; शिवेंद्रराजेंना टक्कर देण्यासाठी भाजपचा ‘हा’ नेता हाती बांधणार घड्याळ”

भाजप आणि शिंदे गटात नाट्यनाराजी; ‘या’ भाजप खासदाराने जाहीरपणे व्यक्त केली खंत

महाराष्ट्रातलं गृहखातं कुणाच्या दबावाखाली? आदित्य ठाकरेंचा सवाल