“…म्हणून अमृता फडणवीसांनी पाठवली विद्या चव्हाण यांना मानहानीची नोटीस”

0
261

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : भाजपा महाराष्ट्र सोशल मीडिया प्रभारी जितेन गजारिया यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह ट्वीट केल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. आशातच  राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी निषेध व्यक्त करताना त्यांनी त्यात अमृता फडणवीस यांनाही याप्रकरणात ओढलं आहे.

हे ही वाचा : नाना पटोलेंच्या विरोधात गावोगाव तक्रारी दाखल करा, चंद्रकांत पाटलांचा कार्यकर्त्यांना आदेश

रश्मी ठाकरेंना राबडी देवींची उपमा दिली हे बरे झाले. म्हणजे एका प्रकारे त्यांनी भाजपाचे महाराष्ट्र सोशल मीडिया प्रभारी जितेन गजारिया यांची साथ दिली. फडणवीसांच्या पत्नीची उपमा दिली असती तर ती नुसती डान्सिंग डॉल अशी लोकांची प्रतिमा झाली असती. निदान रश्मी ठाकरेंची वाईट प्रतिमा नाहीये. हे मला भाजपवाल्यांना सांगावं वाटतं, असे विद्या चव्हाण म्हणाल्या होत्या. त्यानंतर आता अमृता फडणवीस यांनी विद्या चव्हाण यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा केला आहे.

अमृता फडणवीस यांनी विद्या चव्हाण यांना पाठविलेली नोटीस ट्वीट केली आहे. त्यावर एक सणसणीत प्रतिक्रियाही दिली आहे. त्यात अमृता फडणवीस म्हणतात, आपल्याच सूनेच्या आणि पुरोगामी स्त्रियांच्या चारित्र्याचा जी करते अपमान, ती आहे विद्याहीन चव्हाण, आता कोर्टातच जाऊन साफ करावी लागेल, तिने पसरविलेली सगळी विषारी घाण. विद्या चव्हाण मानहानी नोटीस  वाच आणि सुधार स्वतः ला, मगच मिळेल तुला निर्वाण, असं अमृता फडणीवस म्हणाल्या आहेत.

महत्वाच्या घडामोडी – 

अखेर ठरलं! ‘या’ तारखेपासून मिळणार बूस्टर डोस; मुंबई महानगरपालिकेकडून नवी नियमावली जारी”

 मुख्यमंत्री पदाबाबत बोलताना केंद्रीय मंत्री नारायण राणेंचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

राज्यात रावणासारखं दहा तोंडाचं सरकार; निर्बंधांवरून भाजपची टिका

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here