आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
सातारा : राज्यात आगामी काळात महापालिका, नगरपालिका आणि नगरपंचायतीसाठी निवडणुका होणार आहे. सातारा नगरपालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर उदयनराजे आणि शिवेंद्रराजे पुन्हा आमने सामने आले आहेत. खासदार उदयनराजे यांनी सातारा जिल्ह्यामध्ये केलेल्या कामाची पोस्टरबाजी केली आहे. यावरून खासदार शिवेंद्रराजे भोसले यांनी प्रतिक्रिया दिली.
उदयनराजेंनी दुचाकी चालवण्यापेक्षा 5 वर्ष साताराची नगरपालिका व्यवस्थित चालवली असती तर एवढी पोस्टरबाजी करण्याची वेळ आली नसती. पोस्टरबाजीवर खर्च करण्यापेक्षा साताराच्या विकास कामांवर खर्च केला असता, तर बंर झालं असतं., अशी टीका शिवेंद्रराजेंनी केली.
दरम्यान, नगरपालिकेची निवडणूक जवळ आल्याने उदयनराजेंची ही नौटंकी सुरू आहे, असा टोलाही शिवेंद्रराजेंनी यावेळी लगावला.
महत्वाच्या घडामोडी –
“शिवसेनेकडून भाजपला मोठे खिंडार; लातूर जि.परिषद सदस्यासह अनेक पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश”
केशर खाण्याचे ‘हे’ आहेत फायदे; वाचा सविस्तर
आमदार रवी राणा यांची आमदारकी जाणार?; रवी राणांची प्रतिक्रिया, म्हणाले…