Home महाराष्ट्र आमदार रवी राणा यांची आमदारकी जाणार?; रवी राणांची प्रतिक्रिया, म्हणाले…

आमदार रवी राणा यांची आमदारकी जाणार?; रवी राणांची प्रतिक्रिया, म्हणाले…

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : भाजप आमदार रवी राणा यांच्या अडचणीत वाढ झाल्याची चिन्हं दिसून येत आहेत.

विधानसभा निवडणुकीत 28 लाख रुपये खर्च करण्याची मर्यादा असताना रवी राणा यांनी मागच्या निवडणुकीत तब्बल 41 लाख 88 हजार रुपये खर्च केल्याप्रकरणी त्यांच्या अडचणीत आता वाढ होण्याची शक्यता दिसून येत आहे. तसेच त्यांची आमदारकीही धोक्यात असल्याची असल्याचंही बोललं जात आहे. यावर स्वत: रवी राणा यांनी प्रतिक्रिया दिली.

न्यायालयाची कुठलीही नोटीस आम्हाला अद्याप आलेली नाही, निवडणुकीत मी मर्यादित प्रमाणात खर्च केला होता, त्यामुळे न्यायालयात माझी बाजू मांडणार असल्याचं रवी राणा यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, लोकप्रतिनिधित्व कायद्यातील कलम 10-ए अंतर्गत अपात्र ठरविण्याची कारवाई लवकर करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोमवारी निवडणूक आयोगाला दिले आहेत.

महत्वाच्या घडामोडी –

आगामी 2024 च्या निवडणुकीत काँग्रेसच विजयी होईल; ‘या’ ज्येष्ठ नेत्यानं केला दावा

शिवसेना निवडणुकीसाठी अशा पद्धतीनं पैसा गोळा करते; मनसेचा धक्कादायक आरोप

“महाविकास आघाडी सरकारला येणाऱ्या काळात सळो की पळो करुन सोडू”

तुम्ही मुख्यमंत्री नाहीत हे मनातून काढून टाका; नवाब मलिकांचा फडणवीसांना टोला