आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार हे भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे, या चर्चेला अजित पवार यांनी स्वत: पूर्णविराम दिला आहे. जिवात जीव असेपर्यंत मी राष्ट्रवादी काँग्रेसबरोबरच काम करेन, असं विधान अजित पवारांनी केलं. या विधानानंतर भाजपा नेते रावसाहेब दानवे यांनी सूचक वक्तव्य केलं आहे.
अजित पवार बहुमताच्या बाजुने आले तर ते मुख्यमंत्री होऊ शकतात, असं विधान रावसाहेब दानवेंनी केलं आहे. ते जालना येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
ही बातमी पण वाचा : “रवींद्र जडेजाच्या फिरकीसमोर हैदराबाद फलंदाजांचे लोटांगण, चेन्नईचा हैदराबादवर 7 विकेट्सने दणदणीत विजय”
“ज्यावेळी आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र निवडणूक लढले, त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसला काँग्रेसपेक्षा जास्त जागा मिळाल्या होत्या. तरीही अजित पवारांना मुख्यमंत्री होता आलं नाही. या राजकारणातल्या घटना आहेत. मुख्यमंत्री पदावर दावा सांगणं, ही वेगळी गोष्ट आहे आणि बहुमत असणं, ही वेगळी गोष्ट आहे. त्यामुळे अजित पवार बहुमताच्या बाजुने आले किंवा कदाचित 10-20 वर्षांनी त्यांना बहुमत मिळालं, तर ते मुख्यमंत्री होऊ शकतात. माझा त्यांना विरोध नाही. ते चांगले कार्यकर्ते आहेत. धडाडीचे कार्यकर्ते आहेत. ते जे-जे वक्तव्यं करतात, त्याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष आहे, असं रावसाहेब दानवे म्हणाले आहेत.
महत्त्वाच्या घडामोडी –
…तर उद्धव ठाकरे आज मुख्यमंत्री असते; अजित पवारांचं मोठं विधान
“रायगडमध्ये ठाकरेंचा डंका वाजणार, ‘या’ मोठ्या नेत्याची कन्या हाती बांधणार शिवबंधन”
राज्य सरकारला मोठा धक्का; मराठा आरक्षण पुनर्विचार याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली