Home महाराष्ट्र “…तर शिंदे गटातील 3-4 आमदार पुन्हा शिवसेनेत परतणार?”

“…तर शिंदे गटातील 3-4 आमदार पुन्हा शिवसेनेत परतणार?”

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : शिवसेनेचे आमदार एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांसह शिवसेनेविरोधात बंड पुकारलं. या बंडामुळे महाविकास आघाडी सरकार पडलं. आणि शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचं सरकार स्थापन झालं. सरकार स्थापन होऊनही एक महिना होत असला तरी, अजूनही मंत्रीमंडळ विस्तार झाला नाही.

तसेच मंत्रीमडळ विस्तार कधी होणार, असे सवाल विरोधी पक्षाकडून सातत्याने होत आहेत. यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रीमंडळ विस्तार येत्या 2-3 दिवसात होईल, असं सांगितलं. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रीमंडळाविषयी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. त्यामुळे राज्यात उलटसुलट प्रतिक्रिया उमटत आहेत.

हे ही वाचा : “राक्षसी महत्त्वाकांक्षा घेऊन हे सरकार सत्तेत आलं, त्यामुळे ते कोसळणार म्हणजे कोसळणारच”

दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांसह केलेल्या बंडखोरीमुळे त्यांच्याकडे दोन तृतीयांश बहुमत आहे. या आधारेच विधानसभा अध्यक्षांनी वेगळा गट म्हणून शिंदे यांना मान्यता दिली आहे. खरी शिवसेना कुणाची याची कायदेशीर लढाई सुरू आहे. सदस्यांच्या अपात्रतेबाबतही सुनावणी सुप्रीम कोर्टात न्यायप्रविष्ट आहे. 1 ऑगस्टला यावर सुनावणी होणार आहे. जर सरकारने मंत्रिमंडळ विस्ताराची घाई केली तर तीन-चार बंडखोर आमदार नाराज होऊन उद्धव ठाकरेंकडे परत जाऊ शकतात, त्यामुळे शिंदे गटात चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे.

महत्त्वाच्या  घडामोडी –

उद्धव ठाकरेंना धनुष्यबाण चिन्ह शोभणारं नाही, त्यांना लाॅलीपाॅप चिन्ह द्या, ते शोभेल- निलेश राणे

अकोल्यामध्ये शिवसेना फुटली; ‘या’ आमदाराचा पदाधिकाऱ्यांसह शिंदे गटात प्रवेश

दिल्लीच्या तक्तासमोर महाराष्ट्र ना कधी झुकला आहे, ना कधी झुकणार; शिवसेनेत प्रवेश करताच सुषमा अंधारे, गरजल्या