Home महाराष्ट्र शिवसेना नेते आणि आमदारांची बंडखोरी हे सर्व भाजपचे षडयंत्र; सुरतहून परतलेल्या नितीन...

शिवसेना नेते आणि आमदारांची बंडखोरी हे सर्व भाजपचे षडयंत्र; सुरतहून परतलेल्या नितीन देशमुख यांचा आरोप

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

अकोला : शिवसेना नेते व आमदारांची बंडखोरी हे सर्व भाजपचे षडयंत्र आहे, त्यांना राज्य सरकार अस्थिर करायचे आहे. एकनाथ शिंदे यांनी सादर केलेल्या पत्रावरील स्वाक्षरी आपली नाही, ती बोगस आहे, असा खळबळजनक आरोप बाळापूरचे शिवसेना आमदार नितीन देशमुख यांनी केला आहे. आमदार देशमुख यांनी अकोल्यात परतल्यावर पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली.

हे ही  वाचा : “महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा राजकीय भूकंप?; एकनाथ शिंदेंसह 40 आमदार सूरतहून गुवाहाटीत दाखल”

‘राज्य सरकार अस्थिर करण्याचे प्रयत्न भाजप करीत आहे. भाजपमध्ये धमक असेल, तर निवडणुका लावाव्या व जनतेसमोर जावे. आता निवडणूक व्हावी, अशी माझी इच्छा आहे. जनता भाजपला त्यांची जागा दाखवून देतील. मी सच्चा शिवसैनिक असून उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहे, असं नितीन देशमुश म्हणाले आहेत.

दरम्यान, उद्धव ठाकरे, शिवसैनिकांचा विचार करून एकनाथ शिंदे व आमदारांनी परत यावे, असं भावनिक आवाहनही नितीन देशमुश यांनी यावेळी केलं आहे.

महत्त्वाच्या  घडामोडी – 

“मोठी बातमी! राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना कोरोनाची लागण, रिलायन्स रूग्णालयात दाखल”

“महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा राजकीय भूकंप?; एकनाथ शिंदेंसह 40 आमदार सूरतहून गुवाहाटीत दाखल”

एकनाथ शिंदेंच्या नाराजीनाट्यावर शरद पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले…