मुंबई : गेल्या 6 वर्षांपासून चंद्रपूरमध्ये लागू असलेली दारूबंदी अखेर राज्य सरकराने उठवण्याचा निर्णय घेतला. गुरुवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे.
दिवंगत नेते आर. आर. आबा यांनी उभी बाटली, आडवी बाटली करत आणलेली दारूबंदी या सरकारने शेवटी रिचवलीच. भगिनींनो, संसार वाचवायला कंबर खोचून उभ्या राहा. परत चार हात करायची वेळ आणली या सरकारने आपल्यावर, असं चित्रा वाघ म्हणाल्या आहेत.
दरम्यान, चित्रा वाघ यांनी ट्विट करत राज्य सरकारवर टीका केली आहे.
दिवंगत नेते RRआबा यांनी ऊभी बाटली आडवी बाटली करत आणलेली दारूबंदी या सरकारने शेवट रिचवलीचं
भगिनींनो संसार वाचवायला कंबर खोचून उभ्या रहा परत चार हात करायची वेळ आणली या सरकारने आपल्यावर @CMOMaharashtra @AjitPawarSpeaks @VijayWadettiwar @bb_thorat @Dev_Fadnavis @SMungantiwar https://t.co/LWhRndWqex
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) May 27, 2021
महत्वाच्या घडामोडी –
अबब..! अंत्यसंस्कार केलेली व्यक्ती घरी परतली; कुटुंबियांची झोपच उडाली
“महेंद्रसिंग धोनीचा चेन्नई सुपर किंग्सला गुडबाय?”
“नष्ट झालेल्या घरांसाठी दीड लाख, झोपडपट्ट्यांसाठी 15 हजार; ताैत्के चक्रीवादळग्रस्तांसाठी मदत जाहीर”