Home महाराष्ट्र राज्यात 15 दिवस लाॅकडाऊन वाढणार- आरोग्यमंत्री राजेश टोपे

राज्यात 15 दिवस लाॅकडाऊन वाढणार- आरोग्यमंत्री राजेश टोपे

पुणे : वाढत्या कोरोना रूग्णांच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने 1 जूनपर्यंत लाॅकडाऊनची घोषणा केली होती. मात्र आता लाॅकडाऊनची मुदत संपत असून कोरोनाची रूग्णसंख्या लक्षात घेता राज्यातील लाॅकडाऊन वाढविला जाईल, असं म्हटलं जात आहे. यावर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

राज्यात आणखी 15 दिवसांच्या लॉकडाऊनची आवश्यकता आहे. त्याबाबत सर्वांशी चर्चा सुरू असून राज्यात 15 दिवसांपेक्षा अधिक दिवसाचा लॉकडाऊन वाढवण्यात येणार आहे. मात्र, त्याचा अंतिम निर्णय व्हायचा आहे, असं राजेश टोपे यांनी म्हटलं. ते पत्रकारांशी बोलत होते.

राज्यातील पॉझिटिव्हीटी रेट 10 टक्क्यांपेक्षा जास्त असेल तर लाॅकडाऊन केलं गेलं पाहिजे. म्हणूनच 15 दिवसांपेक्षा अधिक कालावधीचा लॉकडाऊन वाढवण्याचा विचार सुरू आहे., असं राजेश टोपे म्हणाले.

दरम्यान, गर्दीचे सर्व कार्यक्रम बंदच राहणार आहेत. ज्या जिल्ह्यात कोरोनाचं प्रमाण कमी झालं तिथे काही प्रमाणात शिथिलता देण्यात येईल, असंही टोपे यांनी सांगितलं. त्यामुळे राज्यात 1 जूननंतर 15 वाढणार असल्याचे संकेत मिळत आहे.

महत्वाच्या घडामोडी –

भगिनींनो संसार वाचवायला कंबर खोचून उभ्या राहा, या सरकारने…; दारुबंदीवरून चित्रा वाघ कडाडल्या

सरकारला दारू विक्रेत्यांकडून मिळणाऱ्या मेव्याचा हेवा; चंद्रपूरमधील दारुबंदी उठवल्यानंतर पडळकरांची टीका

अबब..! अंत्यसंस्कार केलेली व्यक्ती घरी परतली; कुटुंबियांची झोपच उडाली

“महेंद्रसिंग धोनीचा चेन्नई सुपर किंग्सला गुडबाय?”