गुणरत्न सदावर्तेंकडून मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख; मुख्यमंत्र्यांना कोर्टात खेचण्याचाही दिला इशारा

0
833

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

औरंगाबाद : अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी औरंगाबाद येथील मध्यवर्ती बस स्थानकात संपास असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांची भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरें यांच्यावर टीका करताना सदावर्ते यांनी मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख करत

औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर असा केला जातो. मात्र फक्त संभाजीनगर नव्हे तर छत्रपती संभाजीनगर असा उल्लेख करा; अन्यथा तुम्हाला कोर्टात खेचू. असा इशाराही अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी औरंगाबाद येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना दिला.

हे ही वाचा : शरद पवार यांनी घेतली सोनिया गांधींची भेट; चर्चांना उधाण

औरंगाबाद चे नाव संभाजीनगर असं बोललं जातं. मात्र जे लोक या एकेरी नावाने हाक मारत आहेत त्यांना मला सांगायचे आहे यानंतर जर कोणी संभाजीनगर असा एकेरी उल्लेख केला तर त्यांना न्यायालयात खेचण्यात येईल, असं गुणरत्न सदावर्ते म्हणाले आहेत.

दरम्यान, छत्रपती संभाजी नगर, छत्रपती शिवाजी नगर अशाच प्रकारे या महापुरुषांच्या नावाचा उल्लेख व्हायला हवा. असा इशारा त्यांनी यावेळी दिला. तासगावात महिला कर्मचाऱ्यांना स्वच्छतागृह वापरण्यास बंदी घालण्यात आली होती. या गोष्टीचा मी निषेध व्यक्त करतो असंही त्यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

राज ठाकरे यांच्या पुणे दौऱ्यापूर्वीच मनसेला मोठा धक्का; रुपाली पाटलांचा मनसेला रामराम

भाजपाला मोठा धक्का; 12 आमदारांच्या निलंबनाला स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार!

हिंमत असेल तर…; विधानपरिषद निवडणुकीनंतर चंद्रकांत पाटलांचं महाविकास आघाडीला ओपन चॅलेंज

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here