Home देश शरद पवार यांनी घेतली सोनिया गांधींची भेट; चर्चांना उधाण

शरद पवार यांनी घेतली सोनिया गांधींची भेट; चर्चांना उधाण

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

नवी दिल्ली : सध्या दिल्लीतल्या राजकीय घडामोडींना वेग आला आलाय. सोनिया गांधींची राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भेट घेतली आहे. ही भेट पूर्वनियोजित असल्याची माहिती शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.

आजच्या बैठकीला उद्धव ठाकरे यांना आमंत्रण होतं, मात्र ते प्रवास करू शकत नाहीत, त्यामुळे शिवसेनेचा प्रतिनिधी म्हणून मी गेलो होतो. अशी प्रतिक्रिया बैठक संपल्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली.

हे ही वाचा : राज ठाकरे यांच्या पुणे दौऱ्यापूर्वीच मनसेला मोठा धक्का; रुपाली पाटलांचा मनसेला रामराम

संजय राऊत, फारूक अब्दुल्ला आणि मल्लिकार्जुन खर्गेही बैठकीला उपस्थित होते. त्यामुळे पुन्हा राजकीय हलचाली वाढल्याचं पहायला मिळत आहे. आम्ही एकत्रित काम करणार आहोत, उद्या आमच्या पुन्हा बैठक होणार आहे, उद्याच्या बैठकीला शरद पवार उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.

दरम्यान, आजच्या बैठकीला उद्धव ठाकरे यांना आमंत्रण होतं, मात्र ते प्रवास करू शकत नाहीत, त्यामुळे शिवसेनेचा प्रतिनिधी म्हणून मी गेलो होतो. अशी प्रतिक्रिया बैठक संपल्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली.

महत्वाच्या घडामोडी –

भाजपाला मोठा धक्का; 12 आमदारांच्या निलंबनाला स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार!

हिंमत असेल तर…; विधानपरिषद निवडणुकीनंतर चंद्रकांत पाटलांचं महाविकास आघाडीला ओपन चॅलेंज

औरंगाबादेत राज ठाकरेंनी घेतला मोठा निर्णय; जिल्हाध्यक्षांना पदावरुन काढलं!