त्यांनी त्यांचा जो महाराष्ट्राचा फंड आहे तो दिल्लीत दिल्ल्याने…; उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला

0
221

मुंबई : देवेंद्र फडणवीसांनी त्यांचा जो महाराष्ट्राचा फंड आहे तो दिल्लीत दिल्ल्याने ते सगळ्या गोष्टी दिल्लीत जाऊन करतात, असं म्हणत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीसांना टोला लगावला आहे.

दिल्लीमध्ये जाऊन महाराष्ट्रातील करोना परिस्थितीसंदर्भातील माहिती वरिष्ठ नेत्यांना देणाऱ्या फडणवीस यांच्याकडू आपण सल्ला आणि सूचना मागवल्या होत्या असं मुख्यमंत्री म्हणाले आहेत. शिवसेनेचे खासदार आणि ‘सामना’चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंची विशेष मुलाखत घेतली, याच मुलाखतीत उद्धव ठाकरेंनी हे ठाकरे शैलीतील फटकारे लगावले आहेत.

दरम्यान, मी कोण काय बोलतं याकडे लक्ष देत नाही. मी पुन्हा पुन्हा सांगतो, मी माझ्या कामाशी प्रामाणिक आहे. माझ्यावर माझ्या जनतेचा विश्वास आहे. हे ठीक आहेत हे बोलतील पण कुठेही न जाता कुठेही न फिरता ज्या एका संस्थेने, खरं तर ती संस्था कोणती आहे ते मी पाहिलं नाही. मात्र त्या संस्थेने देशाच्या सर्वोत्तम मुख्यमंत्र्यांमध्ये महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची निवड केली. ही सुद्धा त्यांची पोटदुखी असू शकेल, कारण करोनाची लक्षणे वेगवेगळी आहेत,” अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी फडणवीस यांच्यावर निशाणा साधला.

महत्वाच्या घडामोडी-

शाळा आता नाही, पण…; मुख्यमंत्र्यांनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय

हॉस्पिटलचं बिल आधी ऑडिटरकडे मग…; आरोग्यमंत्र्यांची मोठी घोषणा

“…तर आपत्ती व्यवस्थापन कायदा वापरण्याची वेळ आणू नये; शरद पवारांचा डॉक्टरांना इशारा”

…तेंव्हा सरकारने माझं ऐकलं नाही आणि; राहुल गांधींचा केंद्र सरकारवर निशाणा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here