मुंबई : ताैक्ते चक्रीवादळामुळे मुंबईचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. तसेच समुद्र किनारी राहणाऱ्या मच्छिमाराचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून त्याची अजूनही दखल घेण्यात आली नाही. यावर भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी प्रतिक्रिया देत पर्यावरण मंत्री व मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
उपनगरामध्ये उपनगराचे पालकमंत्री आदित्य ठाकरे दाखवा, आणि 18 ते 44 वयोगटातील लोकांचं व्हॅक्सिनेशन फुकट मिळवा, अशी योजन मी स्वत: व मुंबई भारतीय जनता पार्टीने आणली आहे. वर्ष झालं या मुंबईच्या पालकमंत्र्यांचं उपनगरात लोकांना दर्शन होत नाही. निसर्ग वादळ येऊन गेलं, परवाचं चक्रीवादळ झालं, वर्सोवा, मढ, मार्वे, बोरिवली इथल्या मच्छिमारांचं नुकसान झालं, चाळीमध्ये, बिल्डिंगमध्ये पाणी शिरलं, फांद्या पडून लोकांच्या गाड्या फुटल्या, बिल्डिंगची कंपाउंड वाॅल तुटली, 48 तास लोकांचे रस्ते बंद झाले, पण या उपनगराचे पालकमंत्री फक्त आॅनलाईन दिसतायत, प्रत्यक्षात दिसत नाहीत., अशी टाकी भातखळकरांनी यावेळी केली.
माझा प्रश्न आहे, आदित्य ठाकरे कुठे आहेत? त्यांनी किती कोव्हिड सेंटरला भेटी दिल्या?, त्यांनी कोव्हिड हाॅस्पिटलला भेटी दिल्या?, हे आपले कायर घरात लपून बसल्यात आणि म्हणून उपनगरात आदित्य ठाकरेंना दाखवा आणि व्हॅक्सिनेशन फुकट मिळवा, ही घोषणा आज मुंबई भारतीय जनता पार्टीने लागू केली आहे., असं अतुल भातखळकर यांनी म्हटलं आहे.
हरवलेले पालकमंत्री @AUThackeray कुणाला दिसले का तौक्ते वादळानंतर ? सापडले तर सांगा आम्हालाही… pic.twitter.com/Ep7vbmVtMP
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) May 24, 2021
महत्वाच्या घडामोडी –
नुकसानग्रस्तांना राज्य सरकार मदत करेलच, पण फडणवीसांनीही केंद्राला पत्र लिहावं- रोहित पवार
“महाराष्ट्रातलं सध्याचं सरकार आपण घालवू या फाजील विश्वासावर विरोधी पक्ष जगतोय”
कोकणात वादळ चार तास थांबलं पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तीन तासही थांबले नाहीत- प्रवीण दरेकर