Home महाराष्ट्र कोकणात वादळ चार तास थांबलं पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तीन तासही थांबले...

कोकणात वादळ चार तास थांबलं पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तीन तासही थांबले नाहीत- प्रवीण दरेकर

मुंबई : कोकणात वादळ चार तास थांबलं. पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तीन तासही थांबले नाहीत, असं म्हणत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कोकण दौऱ्यावरून पुन्हा एखदा टीका केली आहे.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासहीत रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गाचा तीन दिवस 700 किलोमीटरचा दौरा केला. अनेक गावांमध्ये जाऊन नुकसानग्रस्त लोकांची भेट घेतली. मच्छिमारांशी, बगायतदारांशी संवाद साधला. त्यांच दु:ख समजून घेत मदतीचा विश्वासही आम्ही त्यांना दिला. परंतु राज्याचे मुख्यमंत्री तीन तास सुद्धा कोकणात फिरू शकले नाहीत. यावरून सरकारच्या जनतेबाबत, कोकणवासीयांबाबत काय संवेदना आहेत हे दिसून येतं, असं प्रवीण दरेकरांनी म्हटलं आहे.

वादळापेक्षा जास्त वेग मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आहे. वादळ 4 तास थांबले होते. परंतु मुख्यमंत्री केवळ 3 तास सुद्धा थांबू शकले नाहीत, हे राज्याचे दुर्दैव आहे, असं प्रवीण दरेकर म्हणाले आहेत.

दरम्यान, तौक्ते वादळाचा पालघर जिल्ह्यालाही मोठा फटका बसला. या वादळामुळे अनेकांचं नुकसान झालं आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपच्या आमदार मनिषा चौधरी यांच्या पुढाकाराने पत्रे, ब्लँकेट, बल्ब आणि विविध उपयोगी साहित्याचा ट्रक पालघरला पाठविण्यात आला आहे. प्रवीण दरेकर यांच्या हस्ते या ट्रकला हिरवा कंदिल दाखवण्यात आला. यावेळी दरेकर बोलत होते.

महत्वाच्या घडामोडी –

“ज्या शिवसेनेला कोकणाने भरभरून बळ दिलं त्या शिवसेनेनं कोकणाला वाऱ्यावर सोडून दिलं”

गोबर, गोमूत्र आणि रामदेव ही थेरपीच आता बंद करा- नवाब मलिक

सांगली जिल्ह्यात लाॅकडाऊन वाढणार; पालकमंत्री जयंत पाटलांनी दिले संकेत

“मविआला केवळ भ्रष्टाचाराचा ‘ब्लॅक फंगस’ चिकटलेला नाही, तर पोलिसी वसुलीच्या ‘व्हाईट फंगस’चाही रोग जडलेला आहे”