Home महाराष्ट्र “धक्कादायक! ऑनलाईन शिक्षणासाठी मोबाईल नसल्याने विद्यार्थिनीची आत्महत्या”

“धक्कादायक! ऑनलाईन शिक्षणासाठी मोबाईल नसल्याने विद्यार्थिनीची आत्महत्या”

कराड : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने ऑनलाईन शिक्षणाला सुरुवात केली आहे. मात्र ऑनलाईन शिक्षणासाठी मोबाईल नसल्याने कराड येथील एका शाळकरी विद्यार्थिनीने गळफास लावून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या घटनेचा पोलिस तपास करत आहेत.

दरम्यान, पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, कराड तालुक्यातील ओंड येथे ही धक्कादायक घटना घडली आहे. साक्षी आबासो पोळ (वय 15 रा.ओंड. ता.कराड, जि.सातारा) असं आत्महत्या केलेल्या मुलीचं नाव आहे. आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थिनीच्या कुटुंबाची परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. ती दहावीत शिक्षण घेत होती. तिच्या वडिलांचा 2007 मध्ये मृत्यू झाला होता. वडिलांचे छत्र हरपल्यापासून तिची आई स्वत: तिच्या भावासह कष्ट करुन उदरनिर्वाह करत होते.

दरम्यान, कोरोनामुळे सगऴीकडे ऑनलाईन शिक्षण सुरू आहे. मात्र ऑनलाईन शिक्षण घेण्यासाठी त्या विद्यार्थिनीकडे मोबाईल नव्हता. त्यामुळे ती नैराश्यात होती. मोबाईल नसल्याने तिला अभ्यास करता येत नव्हता. त्यामुळे तिला अभ्यासाचा तणाव आला होता. काल (29 सप्टेंबर) दुपारी तिची आई कामानिमित्त बाहेर गेली होती. त्यावेळी तिने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेमुळं सगळीकडे खळबळ उडाली आहे.

महत्वाच्या घडामोडी-

“उपराष्ट्रपती एम.व्यंकय्या नायडू यांना कोरोनाची लागण”

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राजीनामा द्यावा- प्रियांका गांधी

सनरायजर्स हैदराबादचा पहिला विजय; दिल्ली कॅपिटल्सचा 15 धावांनी पराभव

मनसेचं सरकार आल्यावर व्याजासकट हिशोब चुकता करू; मनसेचा राज्य सरकारला इशारा