धक्कादायक! “कोरोना विषाणू घालवण्यासाठी पुजाऱ्यानं दिला नरबळी”

0
173

ओडिशा : कोरोनाच्या पार्श्वभूमीमध्ये ओडिशामध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कटक जिल्ह्यातील नरसिंहपूरमधील एका मंदिराच्या पुजाऱ्याने एका तरुणाचं शीर धडापासून वेगळं करत ते देवीला अर्पण केलं.

कोरोनाचं संकट नष्ट व्हावं यासाठी त्यानं अंधश्रद्धेतून हे अमानवीय कृत्य केल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे पोलिसांनी या पुजाऱ्याला अटक केली आहे. या मंदिराच्या पुजाऱ्याने आपला गुन्हा देखील कबूल केला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, नरसिंहपूर बंधहुडा गावात बुधवारी रात्री ब्राह्मणी देवी मंदिराच्या परिसरात एका तरुणाचा मृतदेह आढळून आला. स्थानिक पोलिसांनी हत्येसाठी वापरण्यात आलेलं हत्यार जप्त केलं आहे. तसेच मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून दिला आहे.

महत्वाच्या घडामोडी –

निवृत्तीनंतर शिखर धवन दिसू शकतो ‘या’ भूमिकेत

आता मुंबईत अमिताभ, शाहरुखऐवजी तुझ्या घरासमोर गर्दी होणार; सोनू सूद म्हणतो…

…या परिस्थितीतला केंद्र सरकारच जबाबदार-पृथ्वीराज चव्हाण

हिंमत असेल तर सरकार पाडून दाखवा; गुलाबराव पाटलांच भाजपला आव्हान

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here